भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात बनावट विदेशी मद्याचा १ लाखाचा साठा जप्त : दोन जण ताब्यात !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर मोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा एकुण रु. १,०२,८६२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर एका मोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभागाच्या पथकाला मिळाली होती. यानुसार पथकाने सापळा रचून मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर एक मोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना पियुश हळदे यांस अटक केली. पुढील तपास केला असता हॉटेल साई गजानन ढाबा येथुन बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा एकुण रु. १,०२,८६२/- किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला. पियुश गणेश हळदे (वय २५ वर्ष रा.मुक्ताईनगर) व अनंत गणेश वाढे (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई काल करण्यात आली. या कारवाई त अवैध मद्यसाठा मिळुन आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश निं. सोनार,तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान व वाहनचालक सागर क. देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ जवान विठ्ठल हाटकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!