ट्रॅव्हल्स मधून २१ लाखांच्या चांदीची बिस्किटे चोरीला : मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंद
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथील घोडसगाव फाट्यावरील एका हॉटेलसमोर बुधवारी रात्रीच्या सुमारास थांबलेल्या लक्झरी बस मधून ३० किलो वजनाची २१ लाख रुपये किंमतीची चांदीची बिस्किटे असलेली बॅग चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाराम देवासी (वय २४) राहणार राजस्थान हल्ली मुक्काम हिंगोली यांना ३० किलो वजनाची २१ लाख रुपये किंमतीची चांदीची बिस्किटे इंदूर येथे पोहोचविण्यास मालक मनोज देवासी यांनी सांगितले त्यानुसार एका बॅगमध्ये बिस्कीट घेऊन ते हिंगोलीतून रेल्वेने अकोला येथे आले त्यानंतर अकोला इथून चांदीचे बिस्किटे घेऊन ते लक्झरी बसने इंदूरकडे निघाले बुधवारी रात्री साडेबारा वाजता मुक्ताईनगर जवळील घोड्सगाव फाट्यावर बस थांबली असता त्याच वेळी देवासी एक हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घेण्यासाठी खाली उतरले पार्सल घेऊन परत आले त्यावेळी आपल्याजवळील तब्बल ३० किलो वजनाची २१ लाख रुपये किंमतीची चांदीचे बिस्कीटे असलेली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले त्यांनी लागलीच हॉटेल मालकाशी संपर्क केला दोघांनी नंतर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली दरम्यान चौकशीसाठी एक पथक अकोल्याकड़े रवाना झाले आहे. देवाशी हे जेवण्यासाठी उतरले त्या वेळी दोन संशयित व्यक्ती तेथे फिरत होते अशी माहिती मिळाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके करीत आहे