मुक्ताईनगर मधील भीषण आगग्रस्त व्यापाऱ्यांना व्यापारी मंचतर्फे ५१ हजारांची मदत
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज. अक्षय काठोके। गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील काही दुकानांना मध्यरात्री भीषण स्वरूपाची आग लागली होती त्या आगीत व्यापाऱ्यांचा पूर्ण माल जळून अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले होते त्यामुळे त्या व्यापाऱ्यांवर घडलेल्या दुःखद प्रसंगातून त्यांना सावरण्यासाठी मुक्ताईनगर येथील व्यापारांनी मदतीसाठी आवाहन केले होते.
त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुक्ताईनगरातील व्यापाऱ्यांनी ५१ हजार रुपयांची मदत जमा केली ती आज सर्व व्यापाऱ्यांनी मिळून N R बूट हाऊस चे मालक व जगदंबा गोळी बिस्कीटचे मालक या दोन्ही व्यापाऱ्यांना ही मदत सुपूर्द केली मिळालेल्या मदतीमुळे व्यापारी भारावून गेले होते.