भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

चांगदेव तपोभूमीत भाविकांसाठी विविध सुखसुविधा तात्काळ करण्याच्या आ.चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। संत मुक्ताईनगर, आदिशक्ति संत मुक्ताई साहेबांचे शिष्य असलेल्या चांगदेव महाराजांची तपोभूमी असलेल्या चांगदेव येथील हेमाडपंथी मंदिर ठिकाणी काही पुरातन अवशेष आढळले होते तेव्हापासून येथे पुरातत्व विभागाचे नियंत्रण आलेले असून संशोधन सुरू आहे.पुरातत्व विभागाने येथे खोदकाम करून बरीचशी ऐतेहासिक माहिती संकलित केलेली असून यादरम्यान मात्र येथे भाविकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने या ठिकाणी मंदीर जीर्णोद्धार तसेच भाविकांच्या विविध सुख सुविधा यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती.


यानुसार आज दि.4 मार्च 2023 शनिवार रोजी पुरातत्व विभागाचे अधिकारी चांगदेव येथे आलेले होते.त्याचे सोबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यासमवेत सोबत चर्चा करून मंदिर परिसराची पाहणी केली व विविध सुख सोयी सुविधांसाठी उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना केल्या. यावेळी माजी जि प उपाध्यक्ष नंदू महाजन, चांगदेव सरपंच बोदडे, ग्राम पंचायत सदस्य पंकज कोळी, पुरातत्व विभागाचे अधिकारी शिवकुमार भगत, दिवेकर, दानवे आदी तसेच मंदिर समितीचे विश्वस्त व चांगदेव ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!