शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिका व्यतिरिक्त नविन पिकांकडे वळावे– रोहिणी खडसे
कृषिदिन विशेष – मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज, अक्षय काठोके। माजी महसुल कृषी मंत्री ,विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे हे राज्याच्या राजकारणात एक मास लिडर म्हणून ओळखले जातात, त्याच बरोबर त्यांची एक प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा राज्यात ओळख आहे, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत आपल्या शेतात ते सतत नवनवीन प्रयोग करत असतात. फळबाग, जलसंधारण, यांत्रिकीकरण यासह सिडलेस जांभूळ, आखाती बरही खजूर लागवडीचा दिशादर्शक प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला आहे. सध्या एकनाथराव खडसे यांच्या शेतात बरही खजुराचे उत्पादन निघत असुन स्थानिक बाजारपेठे शिवाय मुंबई पुणे कलकत्ता शहरात याला मोठी मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले
आज कृषी दिना निमित्त रोहिणी खडसे यांनी थेट एकनाथराव खडसे यांच्या सोबत खजुर लागवड केलेल्या शेतात जाऊन खजुर लागवडी विषयी माहिती दिली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखले जाते परंतु मागील काही वर्षांपासून वादळ, जास्त तापमान, सि एम व्ही या कारणाने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे योग्य भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. केळी ,कापूस या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून माजी कृषी मंत्री ,विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर येथिल शेतातआखाती बरही खजुराची लागवड केली. यासाठी त्यांनी आखाती देशातून विमानाद्वारे खजुराची रोपे आयात केली त्यांची आपल्या मुक्ताईनगर येथिल शेतात पंधरा एकरावर लागवड केली असून यात नर आणि मादी खजूर रोपांचा समावेश आहे. एकदा लागवड केल्या नंतर तिन वर्षांनी झाडाला फळे येतात, वाढ होते तशी फळे अधिक मिळतात.
प्रति झाडाला ६० ते ८० किलो फळे येतात.याला स्थानिक बाजार पेठेत १०० ते १२० रुपये प्रति किलो दर मिळतो. झाडाची फळे पिवळी धमक असुन चवदार, शर्करायुक्त आहेत. आपल्याकडे गुजरात,राजस्थान राज्यात खजुर रोपांची उपलब्धता आहे परंतु या राज्यातील रोपांच्या खजुराची चव हि तुरट आहे. आखाती देशातून मागवलेल्या खजुर रोपांच्या खजुराची चव हि गोड आहे. गेले चार वर्षांपासून एकनाथराव खडसे हे खजुराचे पिक घेत आहेत. मुक्ताईनगर, जळगाव, भुसावळ ,सावदा,मलकापूर या स्थानिक बाजारपेठेशिवाय ते कलकत्ता येथे आपल्या मालाची विक्री करतात.आगामी काळात प्रोसेसिंग युनिट उभारून ओल्या खजुरावर प्रक्रिया करून त्यापासून खारीक, कोरडा खजूर आणि इतर पदार्थ निर्मितीचा एकनाथराव खडसे यांचा मानस आहे
बरही खजुराच्या लागवडीचा खर्च मुख्य आहे. पुढे तो कमी आहे. शिवाय यात उडीद मुग कापूस असे आंतरपीक सुद्धा घेता येऊ शकते. शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिका व्यतिरिक्त अशा पिकांकडे वळावे यासाठी शासनाने बरही खजुर पिकाविषयी शेतकरी बांधवांना माहिती देऊन शासनाने फलोत्पादन योजनेत समावेश करून त्याला अनुदानावर रोपे उपलब्ध करून द्यावेत, पीकविमा संरक्षण द्यावे अशी अपेक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली