मुक्ताईनगरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर प्रशासनाकडून कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/प्रतिनिधी: जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध लावण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार आज शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आज सोमवारपासून जिल्ह्यात कड़क लॉकडाऊन राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर आज रोजी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात लॉकडाऊन चे अनुषंगाने 4 रिक्षा चालक, 3 दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात आली तसेच विना मास्क फिरणारे 15 लोकांकडून 1500 रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच पो स्टे हद्दीतील लॉक डाउन चे उल्लंघन करणाऱ्या 5 हॉटेल मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या असून उद्या पासून परवानाधारक दुकानांचे व्यतिरिक्त खुले असणारे दुकानांवर गुन्हे दाखल करणेत येणार आहेत. सदरील कारवाई तहसीलदार श्वेता संचेती, मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार तसेच नगर पंचायत कर्मचारी सुरेश आलोने, गणेश कोळी यांचा समावेश होता