भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

‘यलो मोझॅक व्हायरस’ मुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी – ॲड.रोहिणी खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रिय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया ताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणीताई खडसे या विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावतीमध्ये सोयाबीनच्या शेतात जाऊन ‘यलो मोझॅक व्हायरस’ मुळे सोयाबिन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू आणि प्रामुख्याने विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सध्या यलो मोझॅक या रोगाचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.


यलो मोझॅक हा रोग विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. झाडांच्या शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान जन्म घेतात. पीक वाढीच्या कालावधीमध्ये पिवळा मोझॅक रोगाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे पिकाची वाढ खुंटून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या आज अमरावती जिल्हा दौऱ्यात सुप्रियाताई सुळे आणि माजी मंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या सोबत सोयाबीनच्या शेतात जाऊन ‘यलो मोझॅक व्हायरस’ मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.


यलो मोझॅक व्हायरस मुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून. पाने लहान, आखुड, जाडसर व सुरकुतलेली झाली असून
रोगट रोपांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो आहे वाढ खुंटल्याने लागलेल्या शेंगा मध्ये दाणे नसल्याने उत्पन्न शुन्य झाले आहे.शेतकरी बांधवांना शेतातील पिक काढून टाकायला येणारा खर्च होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त लागणार आहे, विदर्भा सोबतच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा संपुर्ण राज्यातच यलो मोझॅक व्हायरस मुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे, तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी,अन्यथा सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत ढकलला जाईल,यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग,सलिल देशमुख, रणजित काळबांडे आणि शेतकरी बांधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!