स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; खा.रक्षा खडसेंच्या पुढाकाराने “७५ मीटर लांब तिरंगा रॅली”
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी।। “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त “हर घर तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत असुन याचाच एक भाग म्हणुन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय भव्य ७५ मीटर लांब तिरंगा घेऊन “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले.
सदर सर्वपक्षीय “तिरंगा रॅली” साठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यामार्फत सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष, नगरपंचायत, तहसिल, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यलय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्र देऊन सर्व कार्यकर्ते व कर्मचाऱ्यासह मोठ्या संख्येन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर “तिरंगा रॅली” जुने मुक्ताईनगर नागेश्वर मंदिर येथून सुरुवात होऊन प्रवर्तन चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते माजी सैनिक, माजी पोलीस, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह सर्वपक्षीय “तिरंगा रॅली” मध्ये माजी मंत्री श्री.एकनाथरावजी खडसे, डॉ.राजेंद्रजी फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, राष्ट्रवादीच्या अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, कॉंग्रेसचे डॉ.जगदीश पाटील, श्री.नंदकिशोर महाजन, सौ.नजमा तडवी, उपनगराध्यक्षा सौ.मनीषा पाटील, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.ललित महाजन, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री.छोटू भोई, श्री. विलास पांडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री.यु.डी.पाटील सर, श्री.ईश्वर रहाणे, कॉंग्रेसचे अॅड. गोसावी, माजी प.स.सभापती श्री.विलास धायडे,
भाजप तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल्ल जवरे, श्री.संतोष खोरखेडे, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, भाजपा शहराध्यक्ष श्री.पंकज कोळी, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.अंकुश चौधरी, मनसेचे श्री.अतुल जावरे, प्रहारचे श्री.मोहन महाजन, श्री. राजेंद्र सांगळकर, तहसिलदार श्वेता संचेती, मुख्याधिकारी गायकवाड मॅडम, गट विकास अधिकारी कोतवाल मॅडम, स्थानिक नगर सेवक, जे.ई.स्कूल ज्यु कॉलेज विद्यार्थी व शिक्षक, तहसिल, पंचायत समिती, नगरपंचायत कार्यलय कर्मचारी यांच्या सह मुक्ताईनगर शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.