श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान समाधीसोहळा 4 जुन रोजी साजरा करण्याचे आवाहन
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी( अक्षय काठोके)। श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा यंदा वैशाख कृष्ण दशमी दि.4 जुन 2021 शुक्रवार रोजी घरी राहून साजरा करण्याचे आवाहन श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर समाधीस्थळ यांनी केले आहे.
सविस्तर असे की श्री संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात वैशाख कृष्ण दशमी दिनी अंतर्धान झाल्या.परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा करतात.यावर्षीचे पंचांगात दशमी तीथी 4जुन रोजी आहे. 5 जुन रोजी अहोरात्र एकादशी वृध्दी तिथी व 6 जुन रोजी सुध्दा एकादशी तिथी अशी दोन दिवस आलेली आहे.आपल्याला वारीची, उपवासाची एकादशी 6 जुन रविवार रोजी करावयाची आहे.
एकादशीचे आदले दिवशी दशमी अशी वारकरी भाविकांची भावना असते . परंतू यंदा अनेक वर्षांत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीसंत मुक्ताबाई समाधी सोहळयाबाबत वारकरी संप्रदायातील जेष्ठ -श्रेष्ठ मंडळींशी विचार विनिमय करून त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार व पंचांगात दिल्याप्रमाणे वैशाख कृष्ण दशमी तिथी 4 जुन रोजीच असल्याने त्याच दिवशी यावर्षीचा 724 वा संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा साजरा करण्याचे ठरले आहे
संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथे यंदाही प्रातिनिधिक स्वरूपात 4 जुन रोजीच समाधी सोहळा साजरा करण्यात येईल
कोरोना जागतिक महामारीचे पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच अंतर्धान सोहळा साजरा करावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केले आहे.