भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

नगरपंचायतीस वसुंधरा टीम येण्याची चाहूल लागताच घाणीच्या साफसफाईचे कामे सुरू !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : शहरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे जागोजागी घाण पडलेली दिसत असून सुद्धा नगरपंचायत  कानाडोळा करण्याचे कारण काय असावे परंतु “स्वच्छ भारत सुंदर भारत” यासंदर्भात मुक्ताईनगर  शहराची स्वच्छतेविषयी पाहणी करण्यासाठी वसुंधरा टीम येत असल्याचे समजत असून मुक्ताईनगर येथील नगरपंचायत ने लागलीच घाणीचे साम्राज्य लपवण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.

वसुंधरा टीम मार्फत येणारे अधिकारी यांनी भ्रमणध्वनी द्वारे नगरपंचायत प्रशासन ला कळविले असल्याचे यावरून समजत आहे यामागचा वसुंधरा टीमचा हेतु काय असे कळवून जर वसुंधरा टीम पाहणी करण्यासाठी येत असली तर मुक्ताईनगर नगरपंचायत ला स्वच्छ व सुंदर भारत या मार्फत मिळणारे बक्षीस तरी काय कामाचे असा प्रश्न मुक्ताईनगर येथील नागरिक उपस्थित करत यात आर्थिक देवाण घेवाणीचा भाग तर नाही ना ? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते आहे.

वर्षभर मुक्ताई नगर येथील घनकचरा हा सुका व ओला असा वेगळा जमा केला जातो परंतु डम्पिंग ग्राउंड वरती एकत्र गाडी खाली होत असून यामधील सुका कचरा ओला कचरा असा विलगीकरण याचा विभाग त्या ठिकाणी आखलेला नसतो यामधून नगरपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून सुद्धा एक दिवसीय सुका कचरा ओला कचरा प्लास्टिक या बाबत विलगीकरण आसा कार्यक्रम नगरपंचायत थाटत असून असा थोटांग नगरपंचायत मार्फत का करण्यात येतो व यावर वसुंधरा टीमची महेरबानी का दिसून येत आहे यामागील कारण गुलदस्त्यातच आहे

मागील वर्षांमध्ये हेसुद्धा नगरपंचायतीने असाच प्रकार वसुंधरा टीमच्या समोर केला होता परंतु असाच जर हा कागदोपत्री प्रकार चालू असला तर शासनामार्फत नागरिकांचं पुढचं भविष्य काय ? असा प्रकार नेमका का चालवला जात आहे यामागचे कारण तरी काय फक्त देखावा म्हणून जर हा कार्यक्रम होत असेल व देखाव्या वरती वसुंधरा टीम खुश होत असणार तर या मेहरबानी चे कारण तरी नागरिकांना समजले पाहिजे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे डम्पिंग ग्राउंड येथील जवळील शेतकर्‍यांचे नुकसान होत असताना देखील व डम्पिंग ग्राउंड वर जमा झालेला कचरा वसुंधरा टिम येताच नदीपात्रात ढकलला जातो तरीसुद्धा वसुंधरा टीम त्यांना पुरस्काराने सन्मानित करत असेल तर या मागचा हेतू देवान-घेवान चा आर्थिक असे नागरिकांमध्ये बोललेले जात असून चर्चेचा विषय बनला आहे.


वसुंधरा टीमचे अधिकारी पाहणीसाठी दाखल होताच त्यांना दाखवण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घेतला जातो असे चित्र निर्माण केले जाते यामागे नक्की गोड बंगाल काय ? एक दिवसासाठी साफसफाई दाखवले जाऊन नंतर 364 दिवस मुक्ताईनगरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते यामुळे डम्पिंग ग्राउंड वर आता सुद्धा एक दिवसासाठी मंडप टाकून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचा देखावा करण्यात येईल का ? असा प्रश्न मुक्ताईनगर वासीय विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!