भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यात कृषी धोरण अंतर्गत कृषी पंप धारकांसाठी योजनेचा लाभ,माहिती व तक्रार निवारण मेळावा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी पंप धारकांनी योजनेत लाभ घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याकरिता व प्राप्त वीज बिलाच्या तक्रारींच्या निवारण करीता मुक्ताईनगर विभागाचे मा. कार्यकारी अभियंता श्री. ब्रजेश गुप्ता व मुक्ताईनगर उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता श्री.ज्ञानेश्वर ढोले यांच्या उपस्थितीत दिनांक. ११.०३.२०२२ रोजी अंतुर्ली कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा ( शिबीर) आयोजित करण्यात आले .

तसेच दिनांक १२.०३.२०२२ रोजी कोथळी व चांगदेव , कुऱ्हा काकोडा येथे कृषी धोरण २०२० योजनेबद्दल जागृती व माहिती करिता शिबीर ठेवण्यात आले. व आज दिनांक. १४.०३.२०२२ रोजी हरताळा येथे शिबरी चे आयोजन करण्यात आले या व्यतिरिक्त मुक्ताईनगर विभागा अंतर्गत बोदवड उपविभागीय कार्यालय अंतर्गत मा. उपकार्यकारी अभियंता सचिन मुंडे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत दिनांक. ११.०३.२०२२ रोजी वाकी येथे कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत तक्रार निवारण व माहिती शिबीर आयोजित करण्यात आले.व दिनांक. १४.०३.२०२२ रोजी निमखेड बोदवड येथे शिबिरचे आयोजन करण्यात आले.

तसेच वरणगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत मा. उपकार्यकारी अभियंता श्री. गाजरे व सहाय्यक लेखापाल सौ. दिपाली सोनार याच्या उपस्थितीत वरणगाव उपविभागाअंतर्गत तळवेल कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा ( शिबीर) आयोजित करण्यात आले व असंख्य शेतकरी बांधवांनी सहभाग घेऊन वीजबिल कोरे करून योजनेचा फायदा घेण्याचे आश्वासन दिले. व वीजबिल दुरुस्तीची बाबात पुढील कारवाई करण्यात आली.


शिबीर दरम्यान अंतुर्ली कक्ष येथील सम्माननिय ग्राहक नूर मोहम्मद शेख कदर रा. अंतुर्ली यांनी योजनेमध्ये भाग घेऊन १ लक्ष २७ हजारचा भरणा केला. तसेच तळवेल येथील सम्माननीय ग्राहक श्री. वामन मीठाराम झोपे यांनी १ लक्ष ५६ हजार व श्री. ज्ञानदेव तुकाराम पाटील यांनी १ लक्ष १८ हजाराचा भरणा केला. सर्व्ह अधिकारी / कर्मचारी साम्मांननिय ग्राहकाचे आभार व अभिनंदन केले.


सदरील विविध शिबिरांमध्ये कक्ष अभियंता कक्ष अभियंता श्री. सचिन आठवले ,सहाय्यक अभियंता श्री. अमोल राणे , सहाय्यक अभियंता. सहाय्यक अभियंता श्री. नितीन महाजन सहाय्यक अभियंता.श्री. प्रदीप खैरे तसेच सर्व कक्षातील जनमित्र वर्गाने परिश्रम घेतले. तसेच मा. कार्यकारी अभियंता यांनी कळवले कि, मार्च २०२२ मध्ये विविध कक्षा अंतर्गत शिबिरे घेण्याचे ठरविले आहे. तरी ग्राहकांना विनंती कि जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!