खडसे महाविद्यालयात बेटी बचाव – बेटी पढाव अभियान संपन्न..!
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून आपण साजरा करत असतो. या बालिका दिन-सप्ताह अंतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बेटी बचाव -बेटी पढाव अभियान संपन्न करण्यात आले. यावेळी वाणिज्य विभागातील प्रा. विद्या घडेकर मार्गदर्शक होत्या, तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे अध्यक्षस्थानी होत्या.
आपल्या मार्गदर्शनात विद्या घडेकर यांनी सन 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा लिंग गुणोत्तर दर हजारी 943 इतका आहे म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्या प्रमाणाचा असमतोलपणा आहे, म्हणून प्रत्येक कुटुंबाने बेटी बचाव – बेटी पढाव चा नारा दिला पाहिजे असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी आज देशभरात आणि राज्यात लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असल्याने स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, म्हणून राज्यात आणि देशात लिंग गुणोत्तर चे प्रमाण वाढले तर स्त्रियांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधला जाईल, परिणामी कुटुंब, समाज आणि देश समृद्ध होईल अशी आशा व्यक्त केली. या बालिका दिनाच्या – सप्ताहात बेटी बचाव – बेटी पढाव, मुलगी वाचवा – मुलगी शिकवा असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा आणि आजूबाजूच्या परिसपरिसरात जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महाजन बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उदघाटन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे प्रा.डॉ. प्रतिभा डाके प्रा. राजन खेडकर यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दीपक बावस्कर तर सहसमन्वयक प्राध्यापक विजय डांगे यांनी नियोजन केले. बेटी बचाव बेटी पढाव या जनजागृती अभियानात दीप्ती पाटील, नेहा वाणी, भाग्यश्री जयकर, श्रद्धा गिरी, मुक्ता पाटील, रीना पांडे, आकांक्षा मेढे, भावना ठोंबरे, पूजा गिरी मोनिका धायले, जयश्री दुटटे, अचल कवळे, चैताली वलस्कर, भाग्यश्री बोरोले,गायत्री महाजन इशिका पाटील, दिशा चौधरी,वैष्णवी चौधरी, आयुषी पाटील, सानिका चौधरी, ऋत्विक देशमुख, प्रभू महाजन, स्वप्नील खिरडकर, राजकुमार गायकवाड, सतीश इंगळे,ललित लांडे, रोशनी बहिरकर,धनश्री सदावर्ते, विशाल जयकर, पवन चौधरी, धनराज कोळी व मंगेश बराटे इत्यादी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बोराखडे प्रास्ताविक तेजस सरोदे आणि कुणाल बोदडे आणि आभार प्रदर्शन कृष्णा कोळी यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.