भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

नगरपंचायत अभियंत्यास धक्का बुक्की प्रकरणी गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर/अक्षय काठोके: शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील जुन्या गटारीचा प्रवाह सुरु ठेवा, नविन बांधलेली गटार बंद करा सांगत रसत्यावरील दगड गटारीत टाकून पाण्याचा प्रवाह बंद करुन नगरपंचायतीच्या बांधकाम अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुने गाव सीड फार्म येथे नगरपंचायत स्थापत्य अभियंता रितेश बच्छाव व बांधकाम लिपिक सचिन काठोके हे आज सकाळी 9.30 वाजता सदरील प्रभागात चालू असलेल्या गटारीचे बांधकाम पाहण्याकरिता गेले असता नगरसेविका शमीनाबी अहमद खान यांचा मुलगा आमिन खान खान अहमद खान याने बांधकाम अभियंत्यास तुम्ही पूर्वीचा गटारीत पाण्याचा प्रवाह चालू राहू द्या व नवीन बांधलेल्या गटारीत दगड टाकून प्रवाह बंद केला तेव्हा अभियंत्याने त्यांना म्हटले की तुम्हाला असे करता येणार नाही तेव्हा नगरसेवक पुत्राने गाडीची चावी काढून तुम्हाला नगरपंचायत मध्ये येऊन मारहाण करेल अशी धमकी दिली यावरून तक्रारदार रितेश भाऊसाहेब बच्छाव बांधकाम अभियंता यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीसात भारतीय दंड संहिता १८६,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!