भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरातील सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करावे– युवाशक्ती प्रतिष्ठाण

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरात दि.20 जुन 2021 रविवार रोजी गुन्हेगारी प्रवृत्तीचे दृश्य मुक्ताईनगर शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या प्रवर्तन चौकात नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवास आले ही घटना मुक्ताईनगर शहराच्या शांततेला भंग देणारी आहे काही दिवसांपासुन अशा प्रकारच्या अनेक घटना मुक्ताईनगर शहर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत तसेच अनेक दिवसांपासून काही बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा मुक्ताईनगर शहरात वावर वाढल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे अशा घटनांमधून मुक्ताईनगर शहर सुद्धा दहशतीचा अड्डा बनतो की काय ? अशी मुक्ताईनगर शहर वासीयांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे,

काही वर्षांपूर्वी मुक्ताईनगर शहरात गर्दीच्या तसेच वर्दळीच्या अनेक ठिकाणी अश्या लोकांच्या प्रवृत्तीवर व कृत्यावर नजर ठेवली जावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले यासाठी शासनाचा निधी खर्च सुद्धा करण्यात आला परंतु सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर काही दिवसांनीच सदरील कॅमेरे बंद अवस्थेत पडुन आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारांना कुठलीही भीती किंवा वचक राहिला नसल्याने यापुढे यापेक्षाही भयंकर घटना नाकरता येत नाही तरी अशा घटना रोखण्यासाठी त्यावर नजर ठेवण्यासाठी बंद अवस्थेत असलेले सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात यावे तरी सदरील कॅमेरे येत्या 8 दिवसांत सुरू न झाल्यास मुक्ताईनगर शहरातील युवक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारू अशा आशयाचे निवेदन मा.तहसीलदार महोदय मुक्ताईनगर , मा.पोलीस निरीक्षक महोदय मुक्ताईनगर पो. स्टे. , मा.मुख्याधीकारी महोदय नगर पंचायत मुक्ताईनगर याना युवाशक्ती प्रतिष्ठान मुक्ताईनगर च्या वतीने देण्यात आले यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज कोळी, सामाजीक कार्यकर्ते ऍड राहुल पाटील, हर्षल नपते, अर्जुन कोळी, योगेश सोनार, भुषण कांडेलकर, नरेश मराठे इ.उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!