नगरसेविका भलभलेंच्या पाठपुराव्याने प्र.१४ च्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा कामांस सुरवात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर प्रतिनिधी: मुक्ताईनगर येथील प्रभाग क्रमांक १४ येथे बऱ्याच वर्षापासून रस्त्याची समस्या होती त्याबाबत स्थानिक नगरसेविका सौ.सविता भलभले यांनी वेळोवेळी पाठपुरवठा करून नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामे अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करून आणून या कामास आज पासून सुरवात झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथील खदानबर्डी भागातील प्रभाग क्रमांक १४ येथे बऱ्याच वर्षापासून रस्त्याची समस्या होती त्याबाबत नगरसेविका सौ सविता सुभाष भलभले यांनी वेळोवेळी पाठपुरवठा करून नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामे अंतर्गत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिमेंट काँक्रीटचा लक्ष्मण भोई यांच्या घरापासून ते गायत्री प्रोव्हिजन पर्यन्तचा रस्ता मंजूर करून आणला त्याची आज प्रत्यक्ष सुरुवात झाली रस्त्याच्या चांगल्या प्रति मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी नगरसेवक पुत्र तथा शिवसेना शहर संघटक वसंत सुभाष भलभले या ठिकाणी जातीने हजर होते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.ए. शेजवळ यांनी भेट देऊन कामगारांना सूचना दिल्या यावेळी या प्रभागातील प्रभाकर कोळी, विनोद सुरंगे, लक्ष्मण भोई, नरेंद्र सापधरे(सर), वैभव काठोके, निलेश घटे, चेतन पाटील, सुभाष दैवे, अरुण काळे, मधुकर निळे, विजय भोजने, संजय वानखेडे विकास भगत, विनोद पवार, नामदेव गोरले, पुरुषोत्तम पोलाखेरे व प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते