भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमुक्ताईनगर

मागील वर्षाच्या आदेशावर तारीख बदलवण्याचा चांगदेव ग्रामसेवकाचा प्रताप ; गटविकास अधिकाऱ्याचा ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन

मुक्ताईनगर/अक्षय काठोके : तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी शासकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेला ग्रामसेवकच बेपता झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यांचा कारभार म्हणजे “अपना काम बनता भाड मे जाये जनता” या स्वरुपाचा अनागोंदी माजविणारा व मनमानी कारभार असल्याचे दिसून येत असून त्यांना कार्यालयीन वेळेत नागरिकांचे कामे करण्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही का ? असे काही विशेष अधिकार यांना मिळाले आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामसेवकाने ८ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कर्तव्य बाजावण्यास हजर राहणे शासन नियमानुसार बंधनकारक असताना चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी हे मात्र दुपारी १२ वाजेला ग्रामपंचायत मधून निघून जातात त्यामुळे चांगदेव गावातील ग्रामस्थ विकासापासून लांब आहेत तसेच शासन नियमाप्रमाणे ग्रामसेवक ड्युटी करत असलेल्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असताना सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात तसेच फोन लावल्यावर अरेरावीची भाषा करतात कालच एका लाभार्थ्याने गोठा प्रकरनात मंजुरीसाठी फाईल आणतो असे सांगितले त्यावर सदर ग्रामसेवकाने मला गट विकास अधिकारी यांचेकडून पत्र आले आहे व सध्या गोठा फाईल बंद आहे असे सांगितले शहानिशा करण्यासाठी सदर पत्र मागवली असता ते पत्र 2020 सालचे असून त्यावर पेनाने खोडून (20 च्या ऐवजी 21) म्हणजे 31/ 5 /2021 तारीख टाकण्यात आली या पत्राची शहानिशा करण्यासाठी गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांची भेट घेतली असता हे पत्र मी दिलेच नाही असे उत्तर त्यांच्या कडून देण्यात आले. म्हणजे बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल करण्यात आली असून या ग्रामसेवकाला तारीख खोडून चालू तारीख टाकण्याचा अधिकार दिला कोणी ? हा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक चौधरी हे दुपारपर्यंत पण हजर राहत नाही असे गटविकास अधिकारी यांना सांगितले असता त्यांना काम असतात दोन-तीन गावांचा चार्ज असतो अश्या वल्गना यांच्या कडून करण्यात आली. त्याची शहानिशा केली असता सदर ग्रामसेवकांकड़े फक्त चांगदेव गावाचा चार्ज आहे, गट विकास अधिकारी यांचे नाव वापरत चुकीची माहिती सदरील व्यक्तीस दिली, हे गटविकास अधिकारी यांचा लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत ? असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. गटविकास अधिकारी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे नक्की गौड बंगाल काय? तसेच ग्रामसेवकाकड़े 2-3 गावाचा चार्ज असल्यास तशी पूर्वसूचना ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लिहिणे बंधनकारक आहे जेणेकरून गावकऱ्यांना समजेल ग्रामसेवक हजर आहेत की नाही तरी असे कुठले प्रकारची नोटीस वगैरे ग्रामसेवकाकडून नोटीस बोर्ड वर लिहिले जात नाही तरी या बाबत जिल्हा परिषद मुख्यअधिकारीडॉ. बी. एन. पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज चांगदेव ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे

गोरगरिबांची दाखल्यांसाठी हेळसांड–
गावात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाकडून चांगदेव गावातील ग्रामस्थांना दाखला दिला जात नाही. विविध दाखल्यांसाठी हेळसांड होत असल्याने गोरगरिब ग्रामस्थांना दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवका विरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना त्याची तत्काळ बदली करून त्याच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामसेवकाकडून तारीख बदल करत देण्यात आलेल पत्र.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!