अश्या बातम्या रोज लागतात, आमचं कोण काय वाकड करून घेईल : चांगदेव ग्रामसेवकाची मग्रुरी ! महिलेस दमदाटी, वरिष्ठ अधिकारी मात्र चिडीचूप
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर/प्रतिनिधी: तालुक्यातील चांगदेव येथील आज एक महिला ग्रामसेवकांकडे गेली असता अश्या बातम्या रोज लागतात, आमचं कोण काय वाकड करून घेईल, बातमी लावणाऱ्याला बीडीओ यांच्या कडे बोलून बघून घेऊ, आशा उद्धट भाषेत ग्रामसेवक चौधरी यांच्या कडून सदर महिलेस धमकी देण्यात आले, या मग्रुरी मागे आशीर्वाद नेमका कुणाचा ? वरिष्ठ अधिकाऱ्याचा ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांनी मनमानी आता मग्रुरीत बदलत चालली असून काल “मंडे टू मंडे” ने “मागील वर्षाचा आदेशावर तारीख बदलवत चांगदेव ग्रामसेवकाचा प्रताप ; गट विकास अधिकारी यांचा ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न” या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. याप्रकरणात ग्रामसेवक चौधरी यांनी गोठा फाईल प्रकरणासंदर्भात आधीचे गट विकास अधिकारी यांनी ३१/५/२०२० ला काढलेले आदेशावर याच्या सहीच्या पत्रावरती तारीख बदलवत ३१/५/२०२१ अशी या सालची तारीख पेनाने लिहत नागरिकांची खुशाल दिशाभूल करत चुकीची माहिती दिली, हा सर्व प्रकाराची सध्याचे गट विकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्याकडून शहानिशा करण्यासाठी भेट घेतली असता हे पत्र मी दिलेच नाही असे उत्तर त्यांच्या कडून देण्यात आले. म्हणजे बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल करण्यात आली असून या ग्रामसेवकाला वरीष्ठ अधिकाऱ्याच्या पत्रावरील तारीख खोडून चालू तारीख टाकण्याचा अधिकार दिला कोणी ? हा गहन प्रश्न उपस्थित झाला असून याबाबत वरिष्ठ अधिकारी चिडीचूप का ? स्थानिक आमदार मग्रुरीखोर अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करतील का ?
शासन नियमानुसार ग्रामसेवक ड्युटी करत असलेल्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असताना सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात तसेच फोन लावल्यावर अरेरावीची भाषा करतात या सर्व प्रकाराबाबत गट विकास अधिकारी यांचे नाव वापरत चुकीची माहिती सदरील व्यक्तीस दिली हे गटविकास अधिकारी यांचा लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. याप्रकरणाचा जाब जिल्हा पातळी वरील अधिकारी तरी लक्ष देऊन विचारणार आहे की नाही ?