भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगर

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या प्रस्तावाच्या मंजूरीचे परिपत्रक जारी !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : येथील उपजिल्हा रुग्णालय कोरोना काळात नागरिकांसाठी संजीवनी ठरलं त्यामुळे या रुग्णालयाचा आणखी विस्तार व्हावा येथे महागड्या व अवघड शस्त्रक्रिया व्हाव्यात जेणेकरून परिसरातील गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळेल , तसेच येथे सर्जन , व डॉक्टरांची संख्या वाढावी , स्वतंत्र रक्तपेढी निर्माण व्हावी , अतिदक्षता विभाग असावे असा विकासात्मक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयाची 50 खाटांक्षमता वाढवून 100 खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावा मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.त्यानुसार दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांच्याश्रेणी वर्धन प्रस्तावास मान्यता दिली होती. आणि अवघ्या 6 दिवसात म्हणजेच आज दि 23 फेब्रुवारी 2022 रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावाच्या मंजूरीचे शासनाचे परीपत्रक शासन निर्णय क्रमांक :स्थापना 2021/प्र. क्र.315/आरोग्य-3 नुसार आरोग्य सेवा अवर सचिव महाराष्ट्र शासन रोशनी दिनेश कदम पाटील यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढण्यात आलेले असून मुक्ताईनगर मतदार संघासाठी ही खूप मोठी उपलब्धी असल्याचे बोलले जात आहे.

काय म्हटले आहे परिपत्रकात

मुक्ताईनगर ता.व जि. जळगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेबाबत लोकप्रतिनिधींकडुन सदर रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी उपरोक्त दि. १३.०८.२०२१ च्या पत्रान्वये मुक्ताईनगर ता.व जि. जळगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला असून त्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय

मुक्ताईनगर ता.व जि. जळगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी बांधकाम व पदनिर्मिती करणे यायावत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०२१८१५४१३५१४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!