कंत्राटी डॉक्टर, वॉर्डबॉय यांना कामावरून कमी करू नये- निवेदनाद्वारे मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : कोरोना काळात अंतर्गत कंत्राटी भरती असलेल्या डॉक्टर ,सिस्टर, वार्डबॉय यांना कामावरून कमी करण्यात आले आहे ते करू नये यासंदर्भात कंत्राटी डॉक्टर, वॉर्डबॉय यांचे खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यात कोरोना काळात अंतर्गत कंत्राटी भरती मधील कर्मचारी वर्ग यांनी मुक्ताईनगर तालुक्यात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातलेला असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा दिली होती परंतु आता covid-19 संसर्ग कमी होताच प्रशासनाने कंत्राटी भरती असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले आहे तरी या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या आशयाचे निवेदन आज मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील व रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांना देण्यात आले निवेदनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर ,वार्ड बॉय , सिस्टर यांच्या स्वाक्षर्या आहेत.