भाजप नगरसेविका पतिकडून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की : ठिय्या मांडत कारवाईची मागणी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथिल प्रभाग क्रमांक 8 मधिल भाजपा नगरसेविका सौ. साधना ससाने यांचे पती बापू ससाने यांनी प्रभागात पाणी सोडण्याच्या वादातून पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केल्या प्रकरणी सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी ठिय्या देत कारवाईची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाव्यारे केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्णा नदीला गाळयुक्त पाणी असल्यामुळे मुक्ताईनगर मध्ये पाणीपुरवठा अनियमित होत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाणी पुरवठा दोन तास उशिराने झाला याच कारणाचा राग येऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ साधना ससाने यांचे पती बापू ससाने यांनी पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केली या प्रभागात पाणी सोडल्यास हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली विशेष म्हणजे ही घटना पाणीपुरवठा अभियंते सोनवणे यांच्या समोर घडली त्यामुळे सर्व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन नगरपालिकेचे समोर ठिय्या मांडलेला असून गावातील पाणीपुरवठा बंद केलेला असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले असून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा आता कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे