गुरांच्या गोठ्यांचे बांधकाम नसताना खात्यावर पैसे जमा,लाखोंचा भ्रष्टाचार
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे गुरांचे गोठा बांधकाम साठी प्रकरणे मंजूर होऊन अनुदानाचे पैसे सुद्धा खात्यात जमा झाले परंतु गोठ्याचे बांधकामाच केले नसून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रहारच्या तालुकाध्यक्षांसह कार्यकत्यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी गटविकास अधिकारीऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- गौप्यस्फोट ; ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
- …आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
तालुक्यातील अंतुर्ली येथील ३४ पशुपालकांचे गुरांसाठी नवीन गोठ्यांचे प्रकरण मंजुर झाले होते. परंतु,एकाही लाभार्थाने गोठ्याचे बांधकाम केले नसताना त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम १७ लाख ८८ हजार ४०० रुपये जमा झाली. त्यामुळे पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होतेय.
त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले. प्रहारचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगळकर, उपाध्यक्ष युवराज कापसे, यूवा तालुकाध्यक्ष अनिल कान्हे, शहर अध्यक्ष मोहन महाजन आदींच्या दिलेल्या निवेदनावर सह्या आहे.
दरम्यान, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामविकास अधिकार्यांकडे याबाबतचा अहवाल मागविला असून काय उघडकिस येते व कारवाई होणार का? काय कारवाई होणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.