भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासनमुक्ताईनगर

जिल्हा प्रशासन गाड झोपेत ? पत्रकारांस धमकी देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर व ग्रामसेवकांवर १ महिना उलटूनही कारवाई शून्य ! नव्याने आलेले जि. प. सीईओ कारवाई करतील का ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर/प्रतिनिधी: तालुक्यात बनावट आदेशाची शहानिशा करण्यास गेलेल्या पत्रकारांस गुन्हा दाखल करण्याची धमकी देने, मनमानी कारभार करणे, कार्यालयात पूर्ण वेळ हजर नाही राहिले तरी चालते, नियमानुसार ड्युटीच्या गावी घर घेऊन राहणे बंधनकारक आहे मात्र, येथे हा नियम लागू होत नाही, सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात आताही तोच प्रकार चालू असून एकंदरीत वरीष्ठ अधिकाऱ्याचा याच्यावर वचप नाही किंवा याची यासाठी सहमती असून ते जाणून बुजून दुर्लक्ष किंवा कानाडोळा करत आहे ? की आणखी दुसरे काही ? आदेशाची बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल केली जाते, तसेच मागील वर्षाच्या आदेशावर आताची तारीख टाकत बनावट आदेशाची प्रत दाखवली जात असल्याचे वरिष्ठ गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यास पत्रकारांस गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. असे अत्यंत गंभीर प्रकार असून याबाबत निवेदन देऊन १ महिना होऊनही कुठलीच कारवाई झाली नाही, १ महिना होऊनही जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.पाटील यांच्याकडून कुठलीच कारवाई झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे तालुक्यातील काही शासकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून म्हणजेच जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्यांकडून विशेष सूट दिली गेली होती किंवा आहे ? असे म्हटलं तर वावग ठरायला नको

संबंधित बातमी : मुक्ताईनगर गटविकास अधिकाऱ्यांकडून वृत्तसंकलंनास गेलेल्या पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी : तालुक्यातील पत्रकारांकडून घटनेचा निषेध ! मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी !

संबधित बातमी : अश्या बातम्या रोज लागतात, आमचं कोण काय वाकड करून घेईल : चांगदेव ग्रामसेवकाची मग्रुरी ! महिलेस दमदाटी, वरिष्ठ अधिकारी मात्र चिडीचूप

महिलेस दमबाजी केली, बातम्या लावणाऱ्यास बघून घेऊ अशी धमकी दिली, पत्रकारांस दमदाटी केली, मनमानी कारभार केला तरी अधिकाऱ्यांचे काही होत नाही असे आता नागरिकांना वाटू लागल्याने पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांचा न्याय कुठून मिळेल असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना आता पडला असून याबाबत वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही कारवाई होत नसेल तर हा गहन संशोधनाचा विषय आहे. आता नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे या मग्रूर अधिकाऱ्यावर आपल्या आक्रमक शैलीत या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून कारवाई करतांना दिसतील का ? हे पुढे कळेलच…

संबंधित बातमी : रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पत्रकारांस धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेधार्थ निवेदन : मुक्ताईनगरचे मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी ! 
संबंधित बातमी : मागील वर्षाच्या आदेशावर तारीख बदलवण्याचा चांगदेव ग्रामसेवकाचा प्रताप ; गटविकास अधिकाऱ्याचा ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

याबाबत सविस्तर असे, चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांनी गोठा फाईल प्रकरणासंदर्भात गट विकास अधिकारी यांनी ३१/५/२०२० ला काढलेले आदेशावर याच्या सहीच्या पत्रावरती तारीख बदलवत ३१/५/२०२१ अशी या सालची तारीख पेनाने लिहत नागरिकांची खुशाल दिशाभूल करत चुकीची माहिती दिली, हा सर्व प्रकाराची सध्याचे प्रभारी गट विकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्याकडून शहानिशा करण्यासाठी भेट घेतली असता ही माझी सही नाही, हे पत्र मी दिलेच नाही असे उत्तर त्यांच्या कडून देण्यात आले. व अधिकाऱ्याची पाठराखण करत उलट याबाबत बातमी लावलीस तर तुझ्यावर म्हणजे पत्रकारांस आताच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली एकंदिरत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर घाला घालण्याचे काम केले गेले माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला गेला पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयोग मुक्ताईनगरच्या गट विकास अधिकाऱ्यांनी केला. बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल करण्यात आली अत्यंत गंभीर प्रकार घडला मात्र, या घटनेला घडून 1 महिना उलटूनही सदरील ग्रामसेवकवर व गटविकास अधिकारी नागतीलक यांच्यावर कुठलीच कारवाई होतांना दिसत येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी चिडीचूप का आहेत ? हा संशोधनाचा विषय आहे… मनमानी कारभाराला वाचा फोडत वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्या कारवाईत होत नसेल तर यात काही आर्थिक सेटलमेंटचा गोडबंगाल तर नाही ना असे ठीक ठिकाणी बोलले जात असून चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत महराष्ट्रभर अनेक वृत्तपत्र, न्युज पोर्टल यामध्ये बातम्या आल्याचे सर्वत्र मुक्ताईनगरसह जळगाव जिल्हा चर्चेचा विषय बनला मात्र, आदेशाचे बनावटीच्याकरणं करणाऱ्या ग्रामसेवकांवर व धमकी देणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यांबाबत जिल्हा प्रशासन गाड झोपेचे सोंग घेतल्याचे सर्व जण अनुभवत आहेतच १ महिना उलटूनही कुठलीच ऍक्शन घेताना दिसत नाही अश्या मुजोर अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज सुज्ञ नागरिक व्यक्त करताना दिसून येतात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नवीन रुजू झालेले डॉ.पंकज आशिया या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून काय कारवाई करतात की तेही दुर्लक्ष करत गाड झोपेत जातात यांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

संबंधित बातमी :  ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पोकरा योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचित : अॅड.रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी !

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!