भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकामुक्ताईनगर

ऐन उन्हाळ्यात मुक्ताईनगर वासीयांचे बंद हँडपंप मुळे पाण्यासाठी हाल, नगरपंचायतीचे दुर्लक्ष !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-प्रतिनिधी : शहरातील हॅन्डपॅम्प देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहे याकडे नगरपंचायतीने सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शहर वासीयांकडून करण्यात येत आहे. भर उन्हाळा असताना एवढ्या रण रण त्या उन्हात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासीयांना त्याचा त्रास मात्र सहन करावा लागत आहे.


यंदाच्या आग ओकणार्या उन्हाळ्यात आधीच पूर्णा नदीच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे मुक्ताईनगर शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व अवेळी होतो. त्यात कधी मोटर जळाली तर पाणी कधी येईल याचा अंदाज नाही. त्यामुळे नागरिकांना हँड पंपाद्वारे पाणी वापरासाठी उपलब्ध होते परंतु नगरपंचायतीने याकडे गेल्या तीन महिन्यांपासून दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत आता पावसाळा सुरू होईल त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन मध्येे गाळ अडकल्यास पाणी पुरवठा करण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन. मुक्ताईनगर वासियांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी अशी अपेक्षा मुक्ताईनगर चे नागरिक व्यक्त करीत आहे. याबाबत काही नागरिकांशी मंडे टू मंडे न्युज ने अधिक विचारणा केली असता याबाबतची मुख्याधिकारी व नगरपंचायतीच्या कारभाराची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. अश्विनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या फोन उचलण्यास यांनी असमर्थता दर्शवल्याने बोलण्यास तयार नाही असे दिसून आले. मात्र, संबंधित विभागाशी याबाबत विचारणा केली असता याबाबत अजून टेंडर काढायचे आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात एकंदरीत नगरपंचायतीच्या कारभारावर मोठे प्रश्न चिन्ह ? यामुळे निर्माण होत आहे. मात्र, परिणामी, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!