भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

गायरान वरील अतिक्रमणे न काढण्या बाबत एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात उपस्थित केला तारांकित प्रश्न

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी राज्यातील गायरान जमिनीवर रील अतिक्रमने काढण्यात येऊ नये तसेच मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेले गौण खनिज उत्खनन आणिचोरटी वाळू वाहतुकी बाबत प्रश्न उपस्थित केले याला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी उत्तरे दिली.


यामध्ये राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येऊ नये याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता
त्याला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले ते म्हणाले गायरान जमिनीवरीलअनधिकृत बांधकामे हि वर्ष अखेर पर्यंत निष्कासित करण्या बाबत रोड मॅप तयार करण्या बाबत मा उच्च न्यायालयाने विचाराधीन जनहित याचिका प्रकरणी आदेश दिले आहेत त्यानुसार प्रतिज्ञापत्राद्वारे रोडमॅप मा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत तसेच शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार तरतुदी नुसार पात्र होणारी संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमण निष्कासित करावी अशी शासनाची भूमिका आहे सद्यस्थितीत प्रकरण न्याय प्रविष्ट असून मा उच्च न्यायालयाने दि 6 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशांन्वये निष्कासनाच्या कार्यवाहिस पुढील आदेशा पर्यंत स्थगिती दिली आहे.


तसेच एकनाथराव खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाळू उपसा होत होत असल्या बद्दल तसेच सातोड शिवरात उत्खनन करताना एक जेसीबी आणि एक डंपर मुक्ताई नगर तहसीलदार यांनी जप्त केले होते त्यावर काय कारवाई झाली असा प्रश्न उपस्थित केला होता त्याला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले त्यावेळी ते म्हणाले, मुक्ताई नगर तालुका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना गौण खनिजाचे व वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे तसेच या वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दक्षता पथक तसेच महसुल परिवहन व पोलीस यांच्या संयुक्त पथकामार्फत वेळोवेळी कारवाया करण्यात येतात त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यात1 एप्रिल 2022 पासून नोव्हेंबर महिन्या पर्यंत 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 32लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असून संबंधिता विरुद्ध 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सातोड शिवारात जप्त करण्यात आलेले जेसीबी डंपर मालकास 16 लक्ष रुपये दंडात्मक रकमेच्या नोटीस देण्यात आल्याचे सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!