Video। अपात्रतेच्या भीती पोटी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश– एकनाथ खडसें
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके। मुंबई येथे शिवसेना पक्षप्रवेशसोहळ्या वर खडसेंकडुन तोफ डागण्यात आली असून माझ्या समोर मुक्ताईनगरचे नऊ नगरसेवक बसलेले असून जे गेले त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने मंत्र्यांकडून अपात्रतेवर “स्टे ” आणण्याचे अमिष देऊन प्रवेश केला असल्याचा घणाघात खडसेंनी आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. मुक्ताईनगरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पक्षांतर नाट्यावर खडसे बोलत होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज जो मुक्ताईनगर येथील नगरसेवकांचा मुंबई येथे शिवसेना पक्षप्रवेशसोहळा झाला त्याबद्दल त्याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी फार्महाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली नाथाभाऊ म्हणाले भारतीय जनता पार्टीचे येथे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत1नगरसेवक अपक्ष आहे त्यापैकी जे 6 नगरसेवक गेलेले दिसत आहेत त्यापैकी त्तीन नगरसेवकानी अतिक्रमण केलेले आहे व बनावट दाखला जोडलेला आहे या नगरसेवकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू आहे ते अपात्र होणार आहे आता मी राष्ट्रवादीत आहे परंतु जे गेले ते माझे समर्थक होते व त्यांनी गळ्यात शिवसेनेचा पताका घातल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्र होण्यासाठी एक कारण पुरेसे आहे त्यामुळे यांचे विरुद्ध न्यायालयात दाद मागून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मंत्री महोदय आपल्याला अपात्र होण्यापासून वाचवतील असे आश्वासन त्यांना देऊन प्रवेश घडवण्यात आला असे त्यांनी सांगितले तसेच आता माझ्या सोबत 9 नगरसेवक बसलेले आहेत ते तुम्ही मोजून घ्या असे एकनाथराव खडसे यांनी मंडे टू मंडे न्यूजशी बोलताना सांगितले