ॲड रोहिणी खडसे आयोजीत दांडिया महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे या मुक्ताईनगर परीसरात विवीध शैक्षणिक सामजिक, धार्मिक, उपक्रम राबवित असतात. प्रभु श्रीरामचंद्र यांनी नऊ दिवस रावणाविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला. तसेच आदिशक्ती दुर्गा मातेने माहिशासुराच्या दुष्कृत्याचा अंत करून लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले. म्हणून नवरात्र उत्सव हा आनंद आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो
त्यातुन नऊ दिवस लोक एकत्र येतात, हे नऊ दिवस दांडिया खेळण्याची प्रथा आहे ॲड. रोहिणी खडसे या नवरात्री उत्सवात दरवर्षी मुक्ताईनगर परिसरातील महिलांसाठी दांडिया महोत्सवाचे आयोजन करतात
यावर्षी सुध्दा त्यांच्या तर्फे महिलांसाठी दांडिया महोत्सवाचे दि १९ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत
संध्याकाळी ७ ते १० या वेळात गोदावरी मंगल कार्यालय , भुसावळ रोड मुक्ताईनगर येथे आयोजन करण्यात आले
दि १९ ऑक्टोबर रोजी दांडिया महोत्सवास सुरुवात झाली असुन मुक्ताईनगर परिसरातील महिलांचा दांडिया महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत आहे.
या दांडिया महोत्सवात २२ ऑक्टोंबर रोजी मराठी सिनेसृष्टी, आणि सिरियल विश्वात आपल्या अभिनयाने आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केलेल्या आणि
झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सईची भूमिका साकारून घरा घरात पोहचलेल्या अभिनेत्री गौतमी देशपांडे या मुक्ताईनगरकरांच्या भेटीला येत आहेत
तरी मुक्ताईनगर परिसरातील महिला भगिनींनी दांडिया महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी केले आहे