भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगरराजकीय

एकनाथ खडसे यांचा बद्दल फेसबुक आक्षेपार्ह पोस्ट : राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी: फेसबुक अकाऊंट वरून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी फेसबुक युजरवर कारवाई करण्याची मागणी निवेदना द्व्यारे करण्यात आली आहे. 

आज राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधीत युजरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट आणि चित्रफीत शेअर केली असून यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या युजरवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथील पोलीस स्थानकात निवेदन देऊन विजय डोके या फेसबुक युजरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन शिवराज पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सोशल मीडिया सेल ), शहीद खान तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक, सुनील काटे तालुका सरचिटणीस, राजूभाऊ माळी शहर अध्यक्ष, बापू ससाणे, विनोद काटे आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!