भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

संत मुक्ताई मंदिराच्या बांधकामासाठी आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने ५ कोटी निधीची तरतूद

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-प्रतिनिधी : संत मुक्ताई महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सवा निमित्त दि.1 मार्च 2022 रोजी आदिशक्ती मुक्ताई यांच्या कोथळी ता.मुक्ताईनगर येथील मूळ मंदिरात पहाटे पूजा व अभिषेक साठी आमदार चंद्रकांत पाटील हे सपत्नीक आले असता येथे मंदिराचे पुजारी व भाविक वारकऱ्यांनी कोरोना काळापासून निधी अभावी मुक्ताई मंदिराचे बांधकाम रखडलेले असल्याची माहिती दिली होती.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते. यानंतर त्यांनी अधिवेशन काळात राज्याचे पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी तातडीने 5 कोटी रुपये निधी ची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

मंदिराचे हेमांड पंथी लुक चे काम प्रगती पथावर होते. परंतु कोरोना काळात शासनातर्फे सर्वच निधींवर कात्री लावण्यात आलेली होती. याचा परिणाम जुनी कोथळी येथे सुरू असलेल्या मुक्ताई मंदिराच्या बांधकामावर झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून काम बंद पडलेले होते. दरम्यान च्या काळात वारकरी व भाविकांना सदरील काम तात्काळ पूर्णत्वास जावे अशी आशा होती.परंतु कोरोना विश्व महामारीने सर्वच आशांवर पाणी फिरले होते.परंतु आमदारांनी याबाबत पाठपुरावा केल्याने या बांधकामावर सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद झाल्याने आता लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जाईल अशी निर्माण झालेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!