भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये पुन्हा १८ लाखाचा गुटखा जप्त, अन्न औषध प्रशासनाची कारवाई, स्थानिक पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी, अक्षय कठोके। अलीकडच्या काळात अवैध गुटखा तस्करी व विक्रीचा मोठया प्रमाणावर घटना घडत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ हॉटेल ओम साई जवळ अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल १८ लक्ष रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांना पिंप्री अकाराऊत गावाजवळ असलेल्या सार्वजनीक ठिकाणी एका वाहनातून छत्रपती संभाजी महाराज नगर येथे प्रतिबंधीत गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी कारवाई करून महेंद्रा बोलेरे हे वाहन जप्त केले. यात प्रतिबंध असलेल्या उत्पादनांसह बोलेरे वाहन जप्त करण्यात आले असून याचे एकत्रीत मूल्य सुमारे १८ लाख ३ हजार ६०० रूपये इतके आहे.

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा १८८, २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील २६ (२) (४); २७ (३) (डी); २७ (३) (ई) व ५९ अन्वये नोंदविण्यात आला आहे. यातील संशयितांमध्ये वाहन चालक सचिन भिमराव कोलते ( तरा. हर्सूल, छत्रपती संभाजी महाराज नगर ); क्लीनर सुभाष रंगनाथ कनासे; वाहन मालक गजानन बाबासाहेब लेंभे, जावेदभाई व सोहेल हबीब ( सर्व रा. छत्रपती संभाजी महाराज नगर ) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे आणि हवालदार संतोष चौधरी हे करीत आहेत.

दरम्यान, एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असताना अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी जळगावहून येथपर्यंत पोहचून कारवाई करतात मग स्थानिक पोलिसप्रशासनाला हे दिसत नाही काय? स्थानिक प्रशासन काय करते? आताच गेल्या चार दिवसांपूर्वी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडून दिला होता ही ताजी घटना असताना पुन्हा-पुन्हा तेच घडत असताना तसेच परिसतात मोठया प्रमाणावर अवैध धंदे बोकाळले असताना प्रशासन कारवाई का करीत नाही? का टाळाटाळ करते? कुठे मुरतंय पाणी,?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!