140 ची बाटली 250 ला मुक्ताईनगर मध्ये अवैध धंद्यांना ऊत, स्थानिक अधिकार्यांचे दुर्लक्ष ! रात्रीच खेळ चाले
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी/अक्षय काठोके। कोरोनाच्या भीषण महामारीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियम लागू केले असतांना मात्र, सर्व नियम पायदळी तुडवत मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात अवैध देशी विदेशी दारूची अव्वा च्या सव्वा भावात विक्री सुरू असून तसेच गुटखा व तंबाखूची विक्री चढ्या दराने व खुलेआमपणे तेजीत सुरू आहे. मध्यप्रदेश मार्गे विविध कंपन्यांचा गुटखा तालुक्यात आणला जात आहे. लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवत गुटखा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा गोरखधंदा मांडला आहे. कालच तालुक्यात १७१ कोरोना बाधित आढळून आले आहे, यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले पण कोरोनाबधित असलेले व तंबाखूजन्य पदार्थ खाणारे कोरोनाचे “सुपर स्प्रेडर’ ठरण्याची चिन्हे आहेत. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. पोलिस यंत्रणा या पदार्थांची व अवैद्य देशी विदेशी दारूची विक्री कशी रोखणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिस प्रशासनाने अत्यंत कडक कारवाई करून विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी सुजाण नागरिकांची मागणी आहे.
अवैध देशी- विदेशी दारू १४० ची २४०ते २५० ला चढ्या भावाने विक्री– लॉकडाऊन मुळे आधीच लोकांच्या हाताला काम नाही त्यातच मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल ,ढाबे व टपऱ्यांवर अवैध देशी- विदेशी दारू ची चढ्या भावाने विक्री केली जात आहे, 140 रुपयांची बाटली तब्बल 240 ते 250 ला विकली जात आहे शासनाकडून दारूची दुकाने बंद आहेत, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू येते तरी कुठून तसेच ही दारू नकली तर नाही ना असा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे व सहज उपलब्ध होत असलेल्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. तरी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालत धडक कारवाईची गरज आहे अशी स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे.
“रात्रीच खेळ चाले” पूर्णाड फाटा विमल गुटखा तस्करांचे मोठे केंद्र खुलेआम तस्करी– गुटख्याची तर तऱ्हाच निराळी आहे. महाराष्ट्रात तर त्याच्या विक्रीवर कायद्याने बंदी आहे. मात्र, मुक्ताईनगरला लागूनच मध्यप्रदेशची सीमा आहे सीमेपर्यंत जाऊन गुटखा आणला जातो त्याची मध्यरात्री 1 ते 4 वाजेच्या सुमारास वाहतूक होत असते येथून मोठ्या प्रमाणात राज्यात बंदी असलेल्या विमल गुटख्या आणून खुलेआम तस्करी पूर्णाड फाट्या इथूनच विमल गुटख्याची विदर्भ व इतर ठिकाणी तस्करी होत असते यावर पोलिसांचे कुठेच नियंत्रण असल्याचे दिसत नाही. उलट त्यांचे त्यास “अभय’ असल्याचे बोलले जाते. यात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जाते टपऱ्यामध्ये विकण्यासाठी गुटखा येतो कोठून? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच दुकाने बंद असल्याचा गैरफायदा घेऊन गुटखा आणि दारूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू आहे. बऱ्याच वेळा गुटका पकडला सुद्धा जातो परन्तु तरीही लाखो रुपयांचा गुटका येतो कसा ? त्यात सातेलोटे तर नाहीना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने व पोलिसांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे.