मुक्ताईनगरात ” सट्टा-मटकाकिंगचे” जाळे भक्कम : पोलीस अधीक्षकांची “अवैध धंदे बंद” ची घोषणा हवेतच विरली…
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा| जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला त्यानंतर ते मुक्ताईनगर येथे आले होते त्या वेळी त्यांनी मुक्ताईनगरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करू, त्यांचेवर कारवाई करू, असे पत्रकारांशी बोलताना आश्वासन दिले होते. परंतु एकंदरीत पाहता अशी कुठलीही परिस्थिती दिसून येत नाही, मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात अव्याहत पणे, कठे खुलेआम, तर कुठे छुप्या रीतीने अवैध धंदे सुरूच आहेत, मुक्ताईनगर शहरात ” मटकाकिंग ” चे जाळे इतके भक्कम झाले आहे की, अगदी फेविकाल का जोड, यात वर पर्यंत आर्थिक सेटलमेंट असल्यामुळे यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे, किंवा थातूरमातूर कारवाई करून देखावा केला जातो.
या खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्याने तर पोलीस पाठीशी घालत नाही ना ..?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, मुक्ताईनगर पोलिसस्टेशन अंतर्गत मुक्ताईनगर शहरातील सट्टा -मटका चे ” केंद्रबिंदू ” असलेले महत्वाचे ठिकाण परिवर्तन चौक, बस स्थानक एरिया येथे सट्टा छुप्या पद्धतीन घेतला जातो. शहरातील गजबजलेल्या भागात सुरू असलेले हे मटका किंगचे साम्राज्य पोलिसांच्या नजरेस न पडणे हे एक आश्चर्यच आहे की….! शहरात खुलेआम पणे अवैध धंद्याचा बोलबाला असताना या कडे जाणूज -बुजून दुर्लक्ष केले जाते, यावर पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही, उलट त्यांची पाठराखण करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचे परिसरात बोलले जाते, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असतील तर शहरा मध्ये अवैध धंदे कसे सुरू आहेत, जर एस पी साहेबांचे आदेश मानले जात नसतील तर सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या आधीपासूनच मुक्ताईनगर मधील सट्टा मटक्या सारखे अवैध धंदे कुठलाही खंड न पडता बिनधास्त पणे सुरू असल्याचे दिसत असल्याने एस पी साहेबाच्या आदेशाचा कुठलाही परिणाम दिसून येत नसल्याने आच्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोना च्या लाकडाऊन मुळे अनेक उधोगधंदे बंद पडले ,रोजगार गेल्याने अनेक लोक बेरोजगार झाले, यामूळे आर्थिक मांदीचा मोठा फटका बसल्याचे आर्थिक तज्ञ सांगत असले तरी सट्टा -मटका धंद्यावर मात्र कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही, उलट हा धंदा मोठ्या तेजीत आलेला आहे ,दररोज लाखो रुपयांची या धंद्याद्वारे उलाढाल होत असल्याने यातून लाखों रुपयाची कमाई केली जात असून, *अर्थपूर्ण प्रेमाचे* सम्बधातून हे अवैध धंदे सुरू असल्याचे खुलेआम पणे बोलले जाते , कारण लागेबांधे असल्याशिवाय हे धंदे चालणं शक्यच नाही ,संबंधितांवर कारवाई करून सट्टा -मटका बंद करण्याची मागणी केली जात असून, पोलीस अधीक्षकांनी दिलेले आश्वासन पाळले जाईल काय ? पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे साहेब कारवाई कधी ,केव्हा करतात या कडे संपूर्ण मुक्ताईनगर वासीयांचे लक्ष लागून आहे .