Video। मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंचाची कोरोना वाढत्या स्पेड संदर्भात महत्वपूर्ण आढावा बैठक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। तालुक्यातील गाव खेड्यातून कोरोना चाचणी, क्वारंटाईन होणे आदी बाबत सहकार्य पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने तसेच होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरून कोरोना स्प्रेडर ठरत असून यामुळे वयस्करच तरुण नागरिकांचे ऑक्सिजन वर जाण्याचे प्रमाण वाढत असून सर्वांचे जीव संकटात सापडत आहेत. यात सर्वात मोठी अडचण म्हणजे त्या त्या गावचे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याचे दिसून आल्याने प्रादुर्भाव वाढण्याचे कारण पुढे येत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण आढावा बैठक मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यासंदर्भात आ. चंद्रकांत पाटील यांनी “मंडे टू मंडे” शी बोलताना सांगितले, ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर 15 व्या वित्त आयोगातून आरोग्यावर खर्च करण्याची तरतूद असल्याने कोरोना अँटीजन टेस्टिंग किट घेतले पाहिजे सोबत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेषतः मोठ्या ग्रामपंचायतीने नॅचरल ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून कोविड केअर सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोय उपलब्ध करुन दिल्यास उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन वर येणाऱ्या रुग्णांच्या प्रश्नांचा प्रचंड भार कमी होईल तसेच वेळेआधीच जर रुग्णांची चाचणी करून बाधित असल्याचे समजताच त्याला क्वारंटाईन करण्यात येऊन त्याच्यावर योग्य ते उपचार केल्यास कोरोना ची साखळी तुटण्यात मदत होईल आणि स्प्रेडर च्या बाबतीत तक्रारी वाढल्याने तोही बंद करण्याच्या दृष्टीने मोठे पावले उचलली जात आहेत तसेच सरपंचांच्या माध्यमातून त्या त्या गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली अडचणी समजून योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी याची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
तर त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई– तहसीलदार श्वेता संचेतीकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व तत्संबंधी तक्रारी व सविस्तर चर्चा यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच मंडळींचा एक व्हॉटस अप ग्रुप आहे त्यावर अँटीजन टेस्ट व आरोग्य प्रशासनाकडे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची माहिती दिली जाईल व यानंतर जर गावात कोरोना बाधित रुग्ण विना कारण फिरून संसर्ग वाढीस कारण ठरत असेल तर त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार श्वेता संचेती यांनी दिली आहे. याप्रसंगी बैठकीमध्ये तहसीलदार श्वेता संचेती गट विकास अधिकारी संतोष नागटिळक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड , नगराध्यक्ष नजमा तडवी ,नायब तहसीलदार प्रदीप झांबरे ,नायब तहसीलदार पीएम पानपाटील, पंचायत समिती विस्तार अधिकारी आर एल जैन , तालुकाप्रमुख छोटू भोई ,प्रवीण चौधरी ,प्रशांत पाटील, वसंत भलभले उपस्थित होते