मुक्ताईनगर मतदारसंघांतील रखडलेल्या पुनर्वसना संदर्भात पुनर्वसन विभागाचे परिपत्रक जारी
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मुक्ताईनगर मतदार संघातील अनेक गावे हतनूर धरण बॅक वाटर व तापी पूर्णा नदीच्या पात्राने प्रभावित झालेले असून या गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न असंख्य समस्या गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या असल्याने नागरिक अनेक मुलभूत व पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत.
यासंदर्भात मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने मंत्री वडेट्टीवार यांच्या मुंबई येथील दालनात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि.२६.०४.२०२२ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास करण्यात आलेले आहे.
सदर बैठकीला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर मतदार संघाचे मदार चंद्रकांत पाटील व प्रधान सचिव (मदत व पुनर्वन, मंत्रालय, मुंबई), विभागीय आयुक्त(नाशिक), जिल्हाधिकारी (जळगाव), कार्यकारी संचालक(तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव) आणि विषयाशी संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांना उपास्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे अशा आशयाचे परिपत्रकअसणार असे पुनर्वसन विभागाचे परिपत्रक श्री रणधीर सूर्यवंशी (विशेष कार्य अधिकारी, मदत व पुनर्वसन विभाग , महाराष्ट्र शासन, मुंबई):यांच्या स्वाक्षरी निशी दि. २२ .०४.२०२२ रोजी जारी करण्यात आले आहे.