मुक्ताईनगर

भारत निर्माण योजनेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा-आ.एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये प्रश्न उपस्थित केला,त्यावेळी ते म्हणाले, चिखली तालुका मुक्ताईनगर जि.जळगाव येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत गैरव्यवहार केलेल्या संबंधिताविरुद्ध कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व गट विकास अधिकारी जळगाव यांना दिलेले असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नसल्याबाबतचे लेखी निवेदन तेथील लोकप्रतिनिधी दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी व त्या सुमारास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढे कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?


याप्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले उत्तर देताना ते म्हणाले, चिखली तालुका मुक्ताईनगर जि.जळगाव येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत गैरव्यवहार केलेल्या संबंधिताविरुद्ध कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व गट विकास अधिकारी जळगाव यांना दिलेले असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नसल्याबाबतचे लेखी निवेदन तेथील लोकप्रतिनिधी दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी व त्या सुमारास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद उपविभाग मुक्ताईनगर यांचा चौकशी अधिकारी म्हणून प्रतिकृत केल्यानुसार त्यांनी चौकशी केली असून त्यात समितीने केलेले कामाचे घेतलेले देयक व प्रत्यक्षात आढळून आलेले कामानुसार रक्कम १६.९२.०६८/- तफावत आढळून आली आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी दिनांक २७ -०७ -२०२२ रोजीच्या पत्रान्वये गट विकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना चौकशी अहवाला प्रमाणे रक्कम रुपये १९.९२.०६८ ही संबंधित तांत्रिक सेवा पुरवठादार तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समिती चिखली ता. मुक्ताईनगर जि.जळगाव यांचेकडील वरून करण्याबाबत तसेच वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यास आर.आर.सी किंवा फौजदारी कारवाई करण्याबाबत कळविले होते.

ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती चिखली ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य यांनी आम्ही पाणीपुरवठा समितीचे सदस्य अथवा लाभार्थी नाही व माझ्या बनावट सह्यांचे कागदपत्र व दस्ताऐवज तयार केलेले आहे असा लेखी खुलासा सादर केलेला आहे आहे त्यामुळे या सर्व बाबींची चौकशीचे काम प्रगतीत आहे. ग्रामपंचायत व स्वच्छता समिती चिखली ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य यांनी चौकशीनंतर पुन्हा नवीन बाबी उपस्थित झाल्याने या बाबींची चौकशी गट विकास अधिकारी स्तरावरून प्रगतीत असल्याने विलंब होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!