भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

Video। मुक्ताईनगरात रस्त्याच्या वादातून तुफान राडा, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

मुक्ताईनगर/अक्षय काठोके: येथील खदान बर्डी भागातील रामदास किसन सापधरे या व्यक्तीने खाजगी प्लॉटवर अतिरिक्त अतिक्रमण करून रहिवाशांचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला आज सुद्धा या व्यक्तीने लोखंडी पोल गाडून कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा या भागातील रहिवाशांनी जाऊन विचारले असता सदर व्यक्तीने महिलांना शिवीगाळ व धमकी दिली त्यावरुन मुक्ताईनगर पोलिसात सौ ज्योती विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात कलम 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर रस्त्याचा वाद मागील तीन वर्षापासून–
याबाबत 2018 मध्ये या भागातील रहिवाशांनी तहसील कार्यालयात उपोषण केले होते तेव्हा तत्कालीन तहसीलदार यांनी भुमिअभिलेख ऑफिसला आदेश देऊन मोजणी करण्याचे सांगितले होते तेव्हा भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी मोजणी करून सदर व्यक्तीने अतिक्रमण केले आहे असा अभिप्राय दिला होता तेव्हा तत्कालीन तहसीलदार यांनी पोलिसांना सोबत घेऊन अतिक्रमण काढून दिले होते तरीसुद्धा सदर व्यक्ती पोल गाडून रस्ता बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे.
सदर व्यक्ती परवानगी कागदपत्र दाखवण्यात असमर्थ–
सदर व्यक्ती मी पुन्हा मोजणी करून शीट बनवले आहे त्यामुळे मी बांधत आहे तेव्हा आज वाद उत्पन्न झाल्यावर दोन्ही गटांना तहसीलदार दालनात बोलवून बाजू ऐकून घेतली असता रामदास किसन सापधरे हे समाधानकारक कागदपत्रे दाखवू शकले नाहीत त्यांच्याजवळच्या मोजणी शीटमध्ये सुद्धा अतिक्रमण दिसत आहे

नगरपंचायत व तहसिल कार्यालय यांचे एकमेकांकडे बोट–
मागील महिन्यात या भागातील रहिवाशांना नगरपंचायतीने नोटीस काढून खाजगी वहिवाटी बाबत न्यायनिवाडा देणे  रस्ता काढून देणे नगरपंचायत कार्यालयाच्या अखत्यारीत येत नसल्याने आपण महसूल विभागाकडे मागणी करण्यात यावी अशी नोटीस दिली होती तेव्हा आज तहसीलदारांना विचारणा केली असता गावातील रस्त्याचा नाय निवाडा देणे नगरपंचायत चे काम असते असे सांगितले तेव्हा या दोन्ही कार्यालयांनी एकमेकांशी समन्वय साधून एकदा काय तो न्याय द्यावा अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे अन्यथा वाद वाढून जीवित हानी होऊ शकते याकडे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!