Video। मुक्ताईनगरात लसीकरण केंद्राबाहेर तोबा गर्दी : सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, कर्मचाऱ्यांकडुन उद्धटपणाचे दर्शन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके: कोरोना ची साखळी तुटावी यासाठी सरकार कडून लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे परंतु नियोजना अभावी मुक्ताईनगर येथील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केली आहे नागरिक सकाळी ४ वाजेपासून दुपारपर्यंत उन्हा-तानात उभे आहेत परंतु तेथे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कुठलीही व्यवस्थित माहिती बाहेरील लोकांना दिले जात नाही अशाने कोरोना संपणार की वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा–
याबाबत माहिती घेण्यासाठी लसीकरण केंद्रात गेलो असता तेथे उपस्थित परिचारिका व वार्डबॉयला सांगितले की येथे एकच नोंदणी केंद्र व लस टोचणी साठी एकच परिचारिका आहे तेव्हा तुम्ही येथील केंद्र वाढवून दोन तीन जणांना एक वेळेस लस दिली तर गर्दी आटोक्यात येऊ शकते तेव्हा तुम्ही यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटा आमच्या हातात काही नाही असे उद्धट प्रमाणे उत्तर देण्यात आले
वशिलेबाजी चा आरोप–
नागरिकांचा असा आरोप आहे की आम्ही सकाळपासून उभे आहेत परंतु वशिलेबाजी करून मागील लोकांना येथे लस दिली जाते तसेच लस उपलब्ध नाही असे सांगण्यात येते व गुपचूप रूममध्ये लसीकरण करण्यात येते
लस उपलब्धता 200 व बाहेर नागरिक 1000–
आज दिवसभरात उपलब्ध लसीबद्दल माहिती घेतली असता केंद्रातून सांगण्यात आले की 200 जणांना लशी देण्यात येईल तेव्हा त्यांना सांगितले की 200 जणांना टोकन देऊन बाकीच्यांना घरी पाठवा तर ते लोक ऐकत नाही आमच्या हातात काही नाही असे उत्तर देण्यात येते यामुळेच मुक्ताईनगर येथील कोरोना ब्रेक होणार नसून त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे