भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगर

आ.चंद्रकांत पाटील यांचे उपोषण लेखी आश्वासन मिळाल्याने स्थगित !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील रूग्णांना पुरेसा ऑक्सीजन मिळत नसल्याने ठेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता मात्र, आ.पाटील यांची मागणी प्रशासनाने मान्य केल्यामुळे उपोषण स्थगित केले आहे.

आज दिनांक २ मे रोजी आ.चंद्रकांत पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मध्यस्थी करीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण व जिल्ह्याचे ऑक्सिजन वितरण व्यवस्था करणारे जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना तात्काळ सूचना करीत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ देवू नका असे निर्देश दिले. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी लेखी आश्‍वासन दिले तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयासाठी तात्काळ रु.२.५० कोटीच्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट ची प्रशासकीय मान्यता दिली तरी सदरील प्लांट चे काम येत्या 8 दिवसात सुरू होऊन महिन्याभराच्या आत सदरील ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू होणार आहे. यामुळे ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध होणार आहे. म्हणून आ.पाटीलांकडून उपोषण स्थागित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!