बहुजन मुक्ती मोर्चा तर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज रावेर लोकसभा मतदार संघाचे बहुजन मुक्ती पार्टी चे प्रभारी प्रमोद सौंदले यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार साहेब यांना देण्यात आले.
निवेदनात प्रामुख्याने मागण्या अशा होत्या1) खते बी-बियाणे जुन्या दरापेक्षा ही पन्नास टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत 2) नाशवंत भाजीपाला फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तूचे दुकानाचे योग्य ते व्यवस्थापन करून दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी3) तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे संबंधित बँकांना आदेश द्यावेत4) बोगस बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री या कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तात्काळ कारवाईचा आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावी वसई तर अनेक मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले निवेदन देतेवेळी शेख हकीम चौधरी, शेख कलीम शेख रसूल मन्यार, बिजलाल इंगळे, राजू वानखेडे ,संध्या हिरोले, प्रमोद गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते