भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरव्हिडिओ

Video। कोविड सेंटरनी ज्यादा बिले आकारल्यास दंड आकारला जाईल– खा. रक्षा खडसे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसांला हजार च्या वर नोंदवली जात आहे. यात कोरोना विषाणूचा या आपत्ती काळात कोवीड सेंटर बंद ठेवणे योग्य नाही. परंतू कोवीड रूग्णांकडून जादा बिले आकारणाऱ्या खासगी कोवीड सेंटरवर भविष्यात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशासनाकडे करणार असल्याचे मुक्ताईनगरात भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबीरात खासदार रक्षा खडसे यांनी बोलतांना सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थिती वर खा.खडसे यांनी भाष्य केले त्या म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाचे सावट अधिक प्रमाणावर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मदत करण्यासाठी तत्पर असून यासाठी रक्तदान शिबीर हा देखील याचाच भाग आहे. भविष्यातही भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा कायम मदत करण्यासाठी तत्पर राहणार आहे खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तर  बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात कोरोना रूग्णांसाठी रक्ताची अधिक आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पाटील, युवा मोर्चा आणि गोळवलकर रक्तदान पेढीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिवसभरात किमान २५ रक्ताच्या बाटल्या संकलन करण्याचा संकल्प असून २५ रक्तदाते असे दोन टप्प्यात हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, माजी जि. प.अध्यक्ष अशोक कांडेलकर युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!