मुक्ताईनगर बी.एस.एन.एल कार्यालय ३३ लाखाच्या महसुली
थकबाकी पोटी सील
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुक्ताईनगर येथील बी.एस.एन.एल च्या प्रमुख कार्यालयाला मुक्ताईनगर तहसील कार्यालयतर्फे ३३ लाख १६ हजार ६०० रुपयांच्या महसुली थकबाकी पोटी सील लावण्याची कारवाई आज करण्यात आली.
बी.एस.एन.एल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या अनधिकृत अकृषिक वापर सुरू असलेल्या मोबाईल टॉवर बाबत सन २०१० ते २०१६ या कालावधीतील अंतर्गत लेखा वसुली रक्कम १० लाख ८४ हजार ६०० रुपये व सन २०१६-१७ ते २०२१-२२ यादरम्यानची रक्कम २२ लाख ३२ हजारपर्यंतची रक्कम अशी एकूण ३३ लक्ष १६ हजार ६०० रुपये वसुली प्रलंबित आहे.
सदरची रक्कम ही २२ मार्च २०२२ पर्यंत सरकार जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार कार्यालय सिल करण्याच्या कारवाईचे आदेश तहसीलदार श्वेता संचेती यांनी काढलेले होते. मात्र २२ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा महसूल शासनाकडे जमा न झाल्याने आज ही तडकाफडकी कारवाई करण्यात येऊन कार्यालय सिल करण्यात आले.