मुक्ताईनगर वनरक्षकाला मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर वनक्षेत्र वडोदा वनपरिक्षेत्रात ड्युटी करीत असताना एका वन रक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत .
संशयित आरोपी रहीम पवार हा डुकरांना मांडण्याकरिता ठेवलेले गोळे घेऊन परत येत असताना वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही .अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे म्हटले असता रहीम पवार यास त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांना धक्काबुक्की केली. व जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या हातावर मारून दुखापत केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोध घेण्याकरिता पोलिस रवाना झाले आहेत.