मुक्ताईनगर येथे आयजी पथकाचे सट्टा सम्राटांवर छापे : पिढी मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : शहरात सट्ट्याची जत्रा जोरात चालू असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांध्ये झळकल्या होत्या त्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेने तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई मागणी करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते येथील अवैध धंद्यांना ऊत आला असुन सट्टा एकदम तेजीत सुरू असल्याचे चर्चा जोरात असतांना त्यानंतर मंडे टू मंडे न्युज मध्ये बातमी झळकली व एलसीबी पथकाने येऊन काही सट्टा मटका घेणारे छोटे मासे यांना ताब्यात घेऊन कारवाई केली मात्र, मोठया माशांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती त्यांतर नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाने कारवाई केली असून एक सट्टा पिढी मालक व तीन एजंट विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौका लगत सट्टा मटका घेत असल्याच्या गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्या पथकाने प्रमोद हरिभाऊ भारंबे, नरेश भागवत शिर्के, विलास देविदास मिस्तरी, राहुल प्रकाश झाल्टे यांच्यावर कारवाई करत यांच्याकडून 17 हजार 800 रुपये रोख सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली असून पोलीस नाईक मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून प्रमोद हरिभाऊ भारंबे, नरेश भागवत शिर्के, विलास देविदास मिस्तरी ,राहुल प्रकाश झाल्टे यांच्यावर मुंबई जुगार एक्ट12(अ) प्रमाणे मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकात पोलीस निरीक्षक बापूराव रोहम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे व इतर कर्मचारी यांचा समावेश होता.