भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मतदारसंघात काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत– नाथाभाऊंचा आरोप

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : गेले तिस वर्ष आमदार मंत्री असताना मतदारसंघात शांतता होती आज काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत आपल्याला अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे त्यासाठी येत्या सर्व निवडणुकी मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असल्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला यावेळी मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे हे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर,माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ ,राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,प स सभापती विकास पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, ,राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील,तालुका अध्यक्ष यु डी पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील,डॉ बि सी महाजन,विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरिझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले
यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी प्रक्रिये विषयी माहिती दिली रोहिणी ताई खडसे खेवलकर या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या गेल्या तिस वर्षा पासून आपण सर्व नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिलात आता सुद्धा हि साथ अशीच कायम राहू द्या व येत्या सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा आपल्या गावातून परिसरातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा आपल्या नाथाभाऊ यांनी सुरू केलेल्या आपल्या परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या कडे आमचा पाठपुरावा सुरू आहे त्यांनी ज्याप्रमाणे जोंधनखेडा धरणासाठी निधी उपलब्ध करून दिला तसा भरीव निधी या योजनेसाठी लवकरच प्राप्त होईल
आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर विकास कामांसाठी सुद्धा निधी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी येत्या काळात जि प, प स निवडणुका मध्ये नवे जुने, गट तट न करता पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून उमेदवाराला निवडणून आणून नाथाभाऊ व पक्षाचे हात मजबूत करावे नाथाभाऊ यांनी गेल्या तिस वर्षात मतदारसंघात सर्वांगीण विकास केला हा विकासाचा रथ पुढे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले कुऱ्हा वढोदा परिसरावर माझे विशेष प्रेम राहिले आहे गेल्या तिस वर्षा पासून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केला पूर्वी या परिसरात येण्यासाठी रस्ते नव्हते माझ्या प्रयत्नातुन आता प्रत्येक गावाला जाण्यासाठी तिन ते चार रस्त्यांचे निर्माण झाले आहे या परिसरातील शेती बागाईत व्हावी यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली लवकरच या योजनेला भरीव निधी उपलब्ध होईल गेले तिस वर्ष मी भाजपचे काम केले तुम्हा सर्वांच्या सोबतीने पक्षाचा विस्तार केला परंतु काहीही गुन्हा केलेला नसताना भाजप आपल्यावर अन्याय केला म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून जे प्रेम तुम्ही गेले तिस वर्ष माझ्यावर केले ते असेच कायम राहू द्या राहिलेले विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत


यावेळी रमेश खंडेलवाल, रणजित गोयनका, मनिषा ताई देशमुख, पुंडलिक कपले, बाळा सोनवणे, पुरकर,विलास पुरकर, विष्णू पुरकर,पवन म्हस्के, महेश भोळे ,रवींद्र दांडगे, वाल्मिक भोलानकर ,सुनिता मानकर, बापू ससाणे, प्रवीण पाटील, शकील सर, बुलेस्ट्रेन भोसले,व कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पडध8कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!