भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगरराजकीय

NCP जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटीला बद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट : कारवाईची मागणी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : जळगाव शहराचे राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना पक्षाने राजीनामा मागितला नव्हता त्यांचे प्रमोशन करत प्रदेश सरचिटणीस पद देऊनही यांच्या काही कार्यकर्त्यांनी फेसबूकवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र भैय्या पाटील यांच्याबद्दल फेसबुक वरती त्यांच्या सुनेच्या नांवाने फेक अकाउंट बनून आक्षेपार्ह भाषा वापरत बदनामी केल्याचा आरोप मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांच्याकडून “मंडे टू मंडे” शी बोलतांना केला असून बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक रविना तडवी यांना निवेदन देत करण्यात आली.

याबाबत अधिक असे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र भैय्या पाटील यांच्याबद्दल फेसबुक वरती त्यांच्या सुनेच्या नांवाने अभिषेक पाटील यांच्या काही कार्यकर्त्यांनी फेक अकाउंट बनून आक्षेपार्ह भाषा वापरत बदनामी केल्याचा आरोप मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांच्याकडून करण्यात आला असून बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक रविना तडवी यांना निवेदन देत करण्यात आली.यावेळी राजू माळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष, एडवोकेट पवन सुधाकर पाटील, मुकेश कराडे, शिवराज पाटील राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, नामदेव पांडुरंग पाटील, प्रमोद धामोडे यु डी पाटील सर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अजय तळेले हर्ष कोटेचा निलेश शिंदे रवींद्र खेवलकर, विवेक पाटील, नितीन बोरले सम्राट पाटील दीपक मराठे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!