अधिकारी मस्त प्रशासन सुस्त, ग्रामसेवकाच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन:
मुक्ताईनगर/प्रतिनिधी: तालुक्यात मनमानी कारभार करा, कार्यालयात पूर्ण वेळ हजर नाही राहिले तरी चालते, नियमानुसार ड्युटीच्या गावी घर घेऊन राहणे बंधनकारक आहे मात्र, येथे हा नियम लागू होत नाही, सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात आताही तोच प्रकार चालू असून एकंदरीत वरीष्ठ अधिकाऱ्याचा याच्यावर वचप नाही किंवा याची यासाठी सहमती असून ते जाणून बुजून दुर्लक्ष किंवा कानाडोळा करत आहे ? आदेशाची बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल केली जाते, असे अत्यंत गंभीर प्रकार असून तालुक्यातील काही शासकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून विशेष सूट दिली गेली आहे का ? महिलेस दमबाजी केली, पत्रकारांस दमदाटी केली, मनमानी कारभार केला तरी काही होत नाही असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना आता पडला असून याबाबत वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही कारवाई होत नसेल तर हा गहन संशोधनाचा विषय आहे. तहसीलदार या मग्रूर अधिकाऱ्यावर आपल्या आक्रमक शैलीत कारवाई करतांना दिसतील का गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून कारवाई करतील का ?
संबंधित बातमी : रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पत्रकारांस धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेधार्थ निवेदन : मुक्ताईनगरचे मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी ! संबंधित बातमी : मागील वर्षाच्या आदेशावर तारीख बदलवण्याचा चांगदेव ग्रामसेवकाचा प्रताप ; गटविकास अधिकाऱ्याचा ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न !
याबाबत सविस्तर असे, चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांनी गोठा फाईल प्रकरणासंदर्भात गट विकास अधिकारी यांनी ३१/५/२०२० ला काढलेले आदेशावर याच्या सहीच्या पत्रावरती तारीख बदलवत ३१/५/२०२१ अशी या सालची तारीख पेनाने लिहत नागरिकांची खुशाल दिशाभूल करत चुकीची माहिती दिली, हा सर्व प्रकाराची सध्याचे प्रभारी गट विकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्याकडून शहानिशा करण्यासाठी भेट घेतली असता ही माझी सही नाही, हे पत्र मी दिलेच नाही असे उत्तर त्यांच्या कडून देण्यात आले. व अधिकाऱ्याची पाठराखण करत उलट पत्रकारांस गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली एकंदिरत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर घाला घालण्याचे काम केले गेले माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला गेला पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयोग मुक्ताईनगरच्या गट विकास अधिकाऱ्यांनी केला. बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल करण्यात आली अत्यंत गंभीर प्रकार घडला मात्र, या घटनेला समोर आणून १४ ते १५ दिवस उलटूनही सदरील ग्रामसेवकवर कुठलीच कारवाई होतांना दिसत येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी चिडीचूक का आहेत ? हा संशोधनाचा विषय आहे… मनमानी कारभाराला वाचा फोडत वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्या कारवाईत होत नसेल तर मिळून काही गोडबंगाल तर नाही ना असे ठीक ठिकाणी बोलले जात असून चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत महराष्ट्रभर अनेक वृत्तपत्र, न्युज पोर्टल बातम्या आल्याचे सर्वत्र मुक्ताईनगर चर्चेचा विषय झाला आहे. आदेशाचे बनावटीच्याकरणं करणाऱ्या ग्रामसेवकांवर व धमकी देणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यांवर तहसीलदार स्वेता संचेती दोन आठवडे उलटूनही कुठलीच ऍक्शन घेताना दिसत नाही अश्या मुजोर अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज सुज्ञ नागरिक व्यक्त करताना दिसून येतात तहसीलदार काय कारवाई करतात यांकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.