मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात भरदिवसा एका इसमावर धारदार शस्त्राने हल्ला !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन:
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात एका इसमावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दि.20 जून रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान चाकु हल्ला करून सदरील चौघांनी प्रवर्तन चौकात सार्वजनिक शिवीगाळ करीत रक्ताने माखलेले शस्त्र दाखवून दहशत पसरविण्याचा धक्कादायक प्रकार करण्याचा प्रयत्न केला असता भडकलेल्या जमावाने चौघांना बेदम धो धो धुतले.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जमावाला शांत केले व चौंघाना चौकात पोलिसी खाकी दाखविली.
याबाबत सविस्तर असे की , शहरातील प्रवर्तन चौकात बुऱ्हाणपूर रोडवरील देशी दारूचे दुकान आहे या ठिकानाहून हे चौघे दारू पिऊन बाहेर पडले व समोरच असलेल्या पान टपरीवर गेले या ठिकाणी टपरीचालक बाहेर गेल्याने त्याची वृद्ध आई दुकान सांभाळत होती .या वृद्धेशी चौघांनी गळ्यातील मंगळसूत्र हेरून वाद घातला हा वाद ऐकून बाजूलाच असलेल्या मोबाईल च्या दुकानातून मोबाईल दुकान मालक सागर पाटील व त्याचे वडील ओंकार पाटील हे बाहेर येऊन वाद का करीत असे विचारताच चौघांनी दोघे पिता पुत्रांना बेदम मारहाण केली व धारदार शस्त्र काढून ते ओंकार पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर सपासप वार केले.यानंतर लागलीच प्रवर्तन चौकात येऊन भुसावळातील फरार नामचीन गुंड याचे नाव घेऊन रक्ताने माखलेल्या शस्त्र हातात घेऊन मुक्ताईनगर करांना सार्वजनिक शिवीगाळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करू लागले यामुळे शहरातील जमाव प्रचंड भडकला आणि चौघांना बेदम मारहाण केली . चौघेही नशेत असल्याने ते जमावाला चिथावणी देत होते.अशात पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.व जमावाला शांत केले . सदरील चौघांनी परिस्थिती पाहता पोलिसांनी देखील खाकी दाखवून चौघांना लाठी चा प्रसाद दिला .या गोंधळाचा फायदा घेत एक फरार झाला तर तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
भुसावाळतील नामचीन गुंडाचे नावाने पोलिसांना धमक्या
सदरील तिघे गुंड पोलिसांना भुसावळातील एका फरार गुंडाचे नावाने धमकी देऊन दहशत पसरविण्याचा धक्कादायक प्रकार करीत होते. तर एक आणखी नामचीन गुंड याचा मुक्ताईनगरात अवैध धंदे करण्याच्या उद्देशाने वावर वाढल्याने त्याच्या माध्यमातून हे मुक्ताईनगर आल्याचे कळते .सदरील गुन्हेगारी मुक्ताईनगरात हात पाय पसरवू शकते यामुळे पोलिसांनी वेळीच यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.