भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

सुरु असलेले ऑफलाईन क्लासेस बंद करण्यात यावे- खाजगी शिक्षक संघटनेचे निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : राज्यात सर्वत्र covid-19 चा प्रादुर्भाव असतांना सुद्धा मुक्ताईनगर शहरात ऑफलाईन क्लासेस सुरू आहे हे क्लासेस बंद करण्याची मागणी करत खाजगी शिक्षक संघटना (PTA) तर्फे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक वृत्त असे की शासनाने ऑफलाइन क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली नसतानासुद्धा मुक्ताईनगर शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे ऑफलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत प्रशासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे मुक्ताईनगर शहरात खाजगी शाळेतील शिक्षक सुद्धा लहान मुलांना घरी बोलावून सर्रासपणे क्लासेस घेत आहे यामुळे कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव वाढू शकतो आपणास आम्हा सर्वांचे अशी विनंती की प्रशासनाने तात्काळ दोन दिवसात शहरातील सदर ऑफलाइन पद्धतीने सुरू असलेल्या क्लासेस बंद करावे त्यांच्यावर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करावी व ज्या घरमालकाच्या घरांमध्ये सर्रासपणे सदरहू ऑफलाइन क्लासेस सुरू असतील त्यांच्यावर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी तसेच अर्ज मिळाल्यापासून दोन दिवसात जर सदर ऑफलाइन क्लासेस वर कारवाई न झाल्यास सदर क्लासेस सुरू राहिल्यास आम्ही सुद्धा सर्व खाजगी संघटनेचे संचालक क्लासेस सुरू करू आमच्या क्लासेस सुरू करण्याच्या कृत्यास सर्वस्वी प्रशासन/ शासन जबाबदार राहील तरी शासनाकडून/ प्रशासनाकडून आम्हाला सदर विनंती अर्ज बाबत योग्य तो न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी एडवोकेट नरेंद्र सापधरे (स्वप्नपूर्ती क्लासेस), चंद्रशेखर कुलकर्णी (गजानन क्लासेस) प्राध्यापक योगेश राणे (मुक्ताई क्लासेस )प्राध्यापक अविनाश नाईक मुकताई क्लासेस ,प्राध्यापक निलेश सावळे सर (इन्फिनिटी क्लासेस)प्राध्यापक श्वेता जैन(निर्मल तारा क्लासेस )प्राध्यापक जयश्री कुलकर्णी (अथर्व संस्कृत क्लासेस) प्राध्यापक मंगेश नीले (समर्थ क्लासेस) या खाजगी क्लासेसचे शिक्षक उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!