भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

फळ पिक विमाच्या प्रलंबित लाभबाबत “तक्रार निवारण समिती” गठीत करण्याचे आदेश, खा. रक्षाताई खडसे यांच्या मागणीस यश

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित असून, सदर शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचा तत्काळ निवारण होणेसाठी तक्रार निवारण समिती गठीत करणे बाबत केंद्रीय कृषी मंत्रालय यांचे कडून महाराष्ट्र राज्य कृषी सचिव यांना आदेश देण्यात आले असून, यासाठी कालच खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री.कैलास चौधरी व श्रीमती शोभा करंदलाजे यांची कृषी मंत्रालय, दिल्ली येथे भेट होती. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री.कैलास चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

“फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये विमा उतरविलेला जळगांव जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा आजपावतो पिक विम्याचा लाभ मिळालेला नसून, त्याबाबत अनेक समस्या आहे. त्यासाठी “तक्रार निवारण समिती” गठीत करणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे मागणी केली होती, आणि आज त्याबाबत कार्यवाही होऊन केंद्रीय कृषी मंत्रालय यांचे कडून “तक्रार निवारण समिती” गठीत करणे बाबत आदेश देण्यात आले आहे. सदर समितीकडे विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करून संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर, समिती करून त्वरित समस्येचे निवारण करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी, जळगांव यांचे मार्फत “तक्रार निवारण समिती” गठन झाल्यावर संबधित शेतकऱ्यांनी तत्काळ संबधित ठिकाणी आपले अर्ज दाखल करणे बाबत, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी फळ पिक विमाच्या प्रलंबित लाभबाबत समस्या असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!