भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगरात रोहिणी खडसे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रमा द्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रेड प्लस ब्लड जळगावच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिडशे रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले, खडसे फार्म येथे भोटा ग्रामस्थांच्या वतीने रोहिणी खडसे यांची लाडू तुला करण्यात आली यावेळी मुक्ताई नगर तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत असलेले वढोदा येथील उपसरपंच रंजना ताई कोथळकर यांनी आपल्या समर्थकांसह आणि पंचाने येथील शिंदे गट व भाजप पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच नगरसेवक मस्तान कुरेशी यांच्या तर्फे रोहिणी खडसे यांची लाडु तुला करण्यात आली निलेश भालेराव यांच्या तर्फे अन्नदान करण्यात आले. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी तर्फे जे ई स्कुल येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी रोहिणी खडसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, अजय बढे यांच्या तर्फे 38 किलो वजनाचा केक कापण्यात आला, अखिल चौधरी यांच्या तर्फे तीन क्विंटल फुलांच्या पुष्पहारा द्वारे रोहिणी खडसे यांचा सत्कार करण्यात आला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहिणी खडसे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे ,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,वक्ता सेलचे विशाल खोले महाराज,युवती सेल जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील,जि प सदस्य निलेश पाटील, कैलास सरोदे,वैशाली तायडे, वनिता गवळे, रामदास पाटील, माजी सभापती विलास धायडे, राजेंद्र माळी, दशरथ कांडेलकर, सुधाकर पाटील, विकास पाटील, प्रदिप साळुंखे, माणिक पाटील, सुनिल पाटील, रामभाऊ पाटील, भाऊराव पाटील, प्रशांत भालशंकर,विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे,सुनिल काटे ,कैलास चौधरी,भरत पाटील, शे जाफर, गोपाळ गंगतिरेप्रविण पाटील, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, विजय चौधरी, प्रदिप बडगुजर, बबलू सापधरे,आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती

एकनाथराव खडसे म्हणाले, रोहिणी खडसेंना यांनी आतापर्यंत जि जि जबाबदारी स्वीकारली ती यशस्वीपणे पार पाडली मुक्ताई सह सूतगिरणी सुरू करून दाखवली, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी असताना बँकेला अ वर्गात आणले साखर कारखाना, मुक्ताई एज्युकेशन सोसायटी, नाट्यपरिषदअशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली विधानसभेत थोडया मतांनी पराभुत झाल्या तरी खचून न जाता आपले कार्य कायम सुरू ठेवले आहे रोहिणीताई या युवा नेतृत्व म्हणून दिवसेंदिवस चमकदार कामगिरी करत आहेत,जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव खेड्यात जाऊन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत तुमच्या आशीर्वादाने त्यांना नक्की यश लाभेल, आगामी काळात सर्वांनी एकजुटीने काम करून सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले

रोहिणी खडसे खेवलकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,आपल्या सर्वांचे प्रेम शुभेच्छा आशिर्वादाने भारावून गेली आहे हे आशिर्वाद प्रेम जनसेवे साठी बळ देत
गेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी जरी पराभव झाला तरी तुमच्या सर्वांच्या प्रेम आशिर्वादाने जनसेवेचे बळ मिळाले त्याच जोरावर जनसंवाद यात्रेला सुरुवात करून मुक्ताईनगर मतदारसंघातील गाव खेड्यात जाऊन जनते सोबत संवाद साधला यातून माणस कळाली या मतदारसंघात एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्या पाटील यांनी संपत्ती पेक्षा जि जिवाभावाची माणसे कमावली आहेत ते कळले, याच जिवाभावाच्या माणसा सोबत राहून आगामी काळात मुक्ताईनगर मतदारसंघ राष्ट्रवादीमय करायचा आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!