राजुरा येथील पोलीस पाटील वृषाली भोलानकर बडतर्फ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुक्यातील कुऱ्हा येथूनच जवळ असलेल्या राजुरा गावातील पोलीस पाटील सौ वृषाली वसंत भोलांनकर यांना जात पडताळणी प्रमाणपत्र बाबत कार्यालयात कोणतेही कागदपत्र सादर न केल्याने आपल्या पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.
सविस्तर असे की सौ वृषाली वसंत भोलांनकर रा राजुरा यांची दि 19 मे 2016 रोजी राजुरा गावच्या पोलीस पाटील आरक्षित (ST) या पदावर नियुक्ती करण्यात आली होती मात्र पाच वर्षे उलटूनही त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र बाबत कार्यालयात कोणतेही कागदपत्र सादर केले नाही तरीही जात पडताळणी संबंधित कोणतेही पुरावे सादर नसतांना त्यांचे पद 11 मे 2021 ते 30 एप्रिल 2031 या तारखे पर्यंत वाढवून दिले मात्र संबंधित कार्यालयाकडून पोलीस पाटील यांच्या वरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही शासन निर्णया नुसार आरक्षित पदावर पोलीस पाटील यांची नियुक्ती केल्या नंतर नियुक्ती आदेशाच्या दिनांक पासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्राची वैधता संमधीत जात पडताळणी समिती कडून घेऊन सक्षम अधिकारी यांना सादर करायची असते जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यास त्यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येते मात्र आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मात्र राजुरा गावातील सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर राजुरा यांनी उपविभिगीय अधिकारी भुसावळ व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांचे कडे दि 23 जून 2021 रोजी तक्रारी अर्ज केला त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून सौ वृषाली वसंत भोलांनकर यांना दि 16 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस पाटील या पदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांनी काढले आहे.